– प्रदेशाध्यक्ष कैलासबापू देशमुख यांनी काढले पत्रक
– लवकरच जिल्हा कार्यकारिणी जाहीर होणार
चिखली (महेंद्र हिवाळे) – अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेच्या राष्ट्रीय पदाधिकार्यांची बैठक पार पडली. त्यामध्ये बुलढाणा जिल्हा घाटावर जिल्हा अध्यक्ष म्हणून दैनिक देशोन्नतीचे पत्रकार प्रताप मोरे यांची फेरनिवड करण्यात आली तर जिल्हा कार्याध्यक्ष पदी लोणार येथील सागर पनाड यांची नियुक्ती करण्यात आली. अशा या निवडीचे प्रसिद्धी पत्रक संघटनेचे प्रदेश अध्यक्ष कैलासबापू देशमुख यांनी काढले आहे.
बुलढाणा जिल्ह्यात गेल्या ३० वर्षापासून दैनिक देशोन्नतीमध्ये निर्भीड व शोध पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट वृत्तकथा, उत्कृष्ट समाज कार्य आणि त्याचं बरोबर वर्षभरापासून अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेमध्ये जिल्हा अध्यक्ष पदावर जबाबदारीने प्रदेश अध्यक्ष कैलास बापू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे कार्य वाढविणे, पत्रकाराच्या अडीअडचणी सोडविणे, त्यांच्या पाठीशी ताकतीने उभे राहणे, कामाचा पाठपुरावा करणारे पत्रकार प्रताप मोरे यांची अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या बुलढाणा जिल्हा घाटावरील जिल्हा अध्यक्षपदी पुन्हा फेरनिवड करण्यात आली आहे. तसेच लोणार येथील सकाळ दैनिकाचे प्रतिनिधी सागर पनाड यांची जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. वरील नियुक्ती अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे केंद्रीय अध्यक्ष मनोहरराव सुने, केंद्रीय कार्याध्यक्ष युसुफ खान, केंद्रीय संपर्क प्रमुख प्रा. रविंद्र मेंढे, केंद्रीय कार्यालय प्रमुख बाबाराव खडसे, केंद्रीय सदस्य अभिमन्यू भगत, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलासबापू देशमुख ह्यांनी केली आहे. आता लवकरच जिल्ह्यातील सर्व तालुक्यात संघटनेचे पदाधिकारी यांची निवड करण्यात येईल. या फेरनिवडीमुळे जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधव, लोकप्रतिनिधी, तथा गावाकरी आणि मित्र मंडळामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.