– रक्तदान शिबिराला आमदार मनोज कायंदे यांनीही दिली भेट!
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – श्री जगद्रगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्यावतीने साखरखेर्डा येथे आज, दि. ४ जानेवारी रोजी रक्तदान महायज्ञ शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ५७ रक्तदात्यांनी शिबीरात भाग घेऊन रक्तदान केले.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्यावतीने साखरखेर्डा येथे पर्श्चिम विदर्भपीठ शेगावचे सदस्य माजी प्राचार्य संतोष दसरे यांनी रक्तदान महायज्ञ शिबीराचे आयोजन केले होते. शिबीराचे उद्घाटन ठाणेदार गजानन करेवाड यांच्याहस्ते करण्यात आले. आमदार मनोज कायंदे यांनी शिबिराला भेट दिली असता, संस्थानचा उपक्रम खरोखरच उल्लेखनीय असून, यामुळे महाराष्ट्रातील सिकलसेल एनोपिया, हिमोफिलीया, थॅलेसेमिया, ब्लड कॅन्सर, किडनी फेल्युअर रूग्णांना रक्ताची नितांत गरज असते. हा दृष्टिकोन समोर ठेवून दरवर्षी रक्तदान महायज्ञ शिबीराचे आयोजन करण्यात येत असल्याने याचा लाभ रूग्णांना होत आहे, असे मनोमन व्यक्त केले. यावेळी सरपंच सौ. सुमनताई जगताप, माजी उपसभापती सुनील जगताप, डॉ. प्रशांत भालेराव, रामेश्वर दानवे, माजी सैनिक अर्जन गवई, वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप सुरुशे, अरुण देशमुख, कैलास खांदेभराड, प्रतिक दानवे, अक्षय दसरे, शिवम इंगळे, आशीष दसरे, कल्पना दानवे, दिलीप धोंडगे, ज्योती इंगळे, सोमेश इंगळे, गोटू कासार उपस्थित होते.
यावेळी मोहन अवचार, अक्षय चेके, गजानन करेवाड, नीलेश बोरकर, रघुनाथ राऊत, प्रमोद खरात, सचिन खंडारे, ज्ञानेश्वर जैवळ, संतोष कोरडे, पवन वायाळ, राहुल ढोरे, अंबादास देशमुख, प्रतिक दानवे, शिवदास खोटे, गोपाल इंगळे, अर्जुन गवई, सत्यनारायण काळुसे, डिंगाबंर खरात, मंगेश सरकटे, भागवत कायंदे, ऋषिकेश अवचार, शुभम खंडारे, वैभव टेकाळे, अभिजित इंगळे, विशाल अवचार, अभिषेक शिंदे, गोपाल सवडदकर, कुमार तायडे, अजय सोनुने, किरण गवई, मयूर हिवाळे, करण अंभोरे, राममूर्ती थोटे, शिवम इंगळे, सोहील रफीक शहा, शेख सोहिल शेख सलीम, रुपेश हिवाळे, भास्कर खराडे, अक्षय दसरे, नारायण थुट्टे, वैभव तुपकर, यश जैस्वाल, रामदास सोरमारे, शिवदास दानवे, अनिकेत जैवळ, विलास खरात, सोमेश इंगळे, गणेश राजगुरू, मंगलसिंग राजपूत, विनोद सोनुने, कैलास शेळके, विनोद राजगुरू, कैलास खांदेभराड, आशीष शिंगणे, नितीन पंजरकर, आतीष जगताप यांनी रक्तदान केले.