चिखली (विशेष प्रतिनिधी) – स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सततच्या आंदोलनानंतर व रविकांत तुपकरांच्या जलसमाधी आंदोलनादरम्यान मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या बैठकीनंतर बुलढाणा जिल्ह्यातील अतिवृष्टिमुळे शेतीपिकाच्या नुकसानीसाठी अंदाजे १७४ कोटी रुपये रक्कम मंजूर आहेत. तर १०६ कोटी रुपये विमा प्राप्त झाला. परंतु आजही चिखली तालुक्यातील असंख्य शेतकरी विमा मिळणे पासून वंचित आहेत. तर अनेकांना तुटपुंजी रक्कम मिळाली असल्याने व अतिवृष्टीची (नापिकीची) शेतवर्यांसाठी २ महिण्यापासून रक्कम मंजूर असूनसुद्धा अचानक आलेल्या ऑनलाइन कार्यपध्दतीमुळे ती रक्कम रखडून पडली आहे. सोयाबीन- कापूस भाव वाढीसाठी धोरणात बदल करण्यात यावा, पीकविमा रक्कम देण्यासह मंजूर असलेली रक्कम खात्यावर टाकावी, या मागण्यांसाठी सातत्याने पाठपुरावा होत असतांना देखील शासन जाणून बुजून शेतकरी प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शेतकरी नेते विनायक सरनाईक यांनी केला. विमा कंपनीकडून उर्वरीत विमा रक्कम देण्यास टाळाटाळ होत असल्याचे सांगत, दि. ११ फेंब्रुवारी रोजी रविकांत तुपकरांच्या नेतृत्वात बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर होऊ घातलेल्या आंदोलनात शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी आरपारच्या लढाईत चिखली तालुक्यातील शेतक-यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सरनाईक यांनी केले आहे.
शेतक-यांच्या सोयाबीन-कापुस प्रश्नांनवर रविकांत तुपकरांनी दिल्ली, मुंबई अधिवेशन काळात नागपुर येथे मंत्र्यांच्या भेटी घेतल्या उपमुख्यमंत्री,राज्याचे कृषीमंत्री यांनी केंद्र शासना सोबत पत्र व्यवहार देखील केला. परंतु शासनाने मागील वर्षी प्रमाणे धोरणात्मक बदल केले नसल्यानेच सोयाबीन-कापसाचे भाव पडल्याचा आरोप स्वाभिमानीचे विनायक सरनाईक यांनी केला आहे. तुपकरांच्या जलसमाधी आंदोलनाच्या माध्यमातुन जिल्ह्यासाठी मिळालेले १०६ कोटी रुपये विमा रक्कम शेतक-यांच्या खात्यावर प्राप्त झाले. परंतु कंपनीच्या मनमानी कारभारामुळे आजही अनेक शेतकरी विम्यापासुन वंचीत आहेत. रविकांत तुपकर यांनी कृषीमंत्री, कृषी सचिव यांना पत्र-व्यवहार करुण सुद्धा विमा कंपनी उर्वरीत रक्कम देण्यास टाळाटाळ करीत आहे. ते म्हणाले की दुसरीकडे जलसमाधी आंदोलना दरम्यान बुलढाणा-वाशिम जिल्ह्यासाठी अतिवृष्टिग्रस्त शेतक-यांसाठी १५७ कोटी व त्यानंतरचे मिळून बुलढाणा जिल्ह्यासाठी नुकसानीची १७४ कोटी महिण्यापासुन मंजुर आहेत. त्यामधे सुद्धा शासनाने शेतकरी संकटात असतांना ऐन वेळी ऑनलाईन कार्यपध्दती आणून महा आयटी कंपनीला काम दिल्याने व ऑनलाइनचा खोडा घातल्याने जी रक्कम ऑफलाइन स्वरुपात नैसर्गीक आपत्ती विभागातुन आठवडाभरात खात्यावर पडु शकली असती ती दोन महिण्यापासुन अडकुन टाकली. तर हि ऑनलाइन प्रणाली म्हणजे हक्काचे पैसे निवडणुकीच्या तोंडावर खात्यावर टाकुन तुमचे मतं लादण्याचा प्रकार असल्याचा आरोप सरनाईक यांनी केला. १०/१२/२०२२ पर्यत ऑनलाइन याद्या फायनल करण्याचे जिल्हाधिकारी यांचे सर्वच तहसिलदारांना आदेश असुनदेखील महा आयटी कंपनीला याद्या जात नाहीत. याचा अर्थ शासनाला व कंपनीला शेतकरी हिताचे देणं घेणं नसल्याचे सरनाईक म्हणाले. तर दि. ११ फेंब्रुवारी रोजी तुपकरांच्या नेतृत्वात बुलढाणा येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर होऊ घातलेल्या आंदोलनात चिखली तालुक्यातील शेतक-यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक यांनी केला आहे.
तुटपुंजी रक्कम प्राप्त शेतक-यांची विमा रक्कम अदा करा!
चिखली तालुक्यातील शेतक-यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक, नितिन राजपुत यांनी कृषी विभागात ठिय्या आंदोलन केले होते. त्यावेळी तालुक्यातील १६ हजार शेतक-यांना ४ कोटी ३८लाख रूपये कमी दिल्याचे समोर आले होते तर तसा तफावत अहवाल शासनास व कंपनीस सादर करण्यात आला. परंतु यावर शासनाने निर्णय घेतला नसल्याने शेतक-यांना तफावतीची रक्कम देण्यात यावी, अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे.