– माजी आ. राहुल बोंद्रे यांची घटनास्थळी धाव, कारमधील तरुणांची केली आस्थेवाईक चौकशी
चिखली (तालुका प्रतिनिधी) – साकेगाव – चिखली रोडवर अपघाताची मालिका सुरूच असून, आज पुन्हा एक भीषण अपघात होता होता टळला. एका स्कुटीस्वार मुलीला वाचविण्याच्या प्रयत्नान भरधाव कार रस्त्याच्या बाजूला जाऊन जागेवर पलटली. या अपघातात सुदैवाने काही हानी झाली नसली तरी कारचे थोडेफार नुकसान झाले आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी कारमधील तरुणांची चौकशी करून त्यांना काही लागले वैगरे नाही ना, याची खात्री करून त्यांना काळजीपूर्वक वाहन चालविण्याचा सल्ला दिला.
साकेगाव ते चिखली रोडवर सूतगिरणीच्या बाजूला माजी सैनिक बंगाळे यांच्या घरासमोर हा प्रकार घडला. ही कार रोडने जात असताना समोरून स्कुटीवर येत असलेल्या मुलीला वाचविण्याच्या नादात वेगात असलेली ही कार अचानक वळवून ती रस्त्याच्या बाजूला घेतल्यानंतर ती जागीच पलटी झाली. या अपघातामुळे अनुराधा नगर व छत्रपती हॉटेलमधील नागरिकांनी कारजवळ धाव घेऊन ही कार सरळ केली. अपघाताची माहिती कळताच माजी आमदार राहुल बोंद्रे हेदेखील घटनास्थळी आले व कारचालक व अन्य एका तरुणाच्या पाठीवर हात देऊन आस्थेवाईकपणे चौकशी केली. कुणाला काहीही दुखापत न झाल्याने काळजी घेण्याचा सल्ला देत, ते निघून गेले. सद्या या रोडचे काम सुरू असल्याने या रोडवर कमी वेगात गाड्या चालविण्याचा सल्ला राहुल बोंद्रे यांनी दिला आहे.
—————