उस्मानाबाद (जिल्हा प्रतिनिधी) – मराठवाडा, विदर्भ स्वतंत्र करून महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याची भाषा करणार्या अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना संतप्त आंदोलकांनी पिटळून लावण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी सदावर्तेंना संरक्षण देत, आंदोलकांना ताब्यात घेतले. मराठवाडा मुक्ती मोर्चा या संघटनेच्यावतीने उस्मानाबादेत आयोजित स्वतंत्र मराठवाडा संवाद परिषदेत हा गोंधळ उडाला. यावेळी सदावर्ते यांना काळे झेंडे दाखविण्यात आले.
मराठवाडा मुक्ती मोर्चातर्पेâ उस्मानबादमध्ये स्वतंत्र मराठवाडा संवाद परिषद होत असतानाच, कार्यक्रमाला उपस्थित असेलेल अॅड.गुणरत्न सदावर्ते यांना मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन जोरदार विरोध करण्यात आला. यावेळी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करुन त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा संतप्त आंदोलनकर्त्यांनी दिला. त्यामुळे स्वतंत्र मराठवाडा संवाद परिषद चालू असताना जोरदार गोंधळ पाहायला मिळाला. सदावर्ते यांच्या स्वतंत्र मराठवाड्याच्या मागणीला जोरदार विरोध करण्यात आला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी अखंड महाराष्ट्र राहिला पाहिजे, महाराष्ट्राचे तुकडे पडता कामा नये, अशी मागणी केली आहे. तर, या आंदोलकांना विरोध करत, सदावर्ते यांनीही स्वतंत्र मराठवाडा झाला पाहिजे, अशी घोषणा देत, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. तर त्यांना विरोध करणार्या आंदोलनकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवत अखंड महाराष्ट्र राहिला पाहिजे, अशा जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.
सदावर्ते म्हणाले, विरोधकांना आम्ही तंबी दिली आहे. दम असेल तर विरोधकांनी पुढे यावे. मराठवाड्यासोबतच आम्ही विदर्भ स्वतंत्र करण्यासाठी लढू व स्वतंत्र करू. मुग गिळून बसतात का काय करतात ते बघू.
सदावर्ते भाजपचे हस्तक – संभाजी बिग्रेड
संभाजी बिग्रेडने आरोप केला की, गुणरत्न सदावर्ते हे भाजपचे हस्तक आहे. महाराष्ट्राच्या भूमीला, प्रबोधनाच्या भूमित उद्धवस्त करण्याचे प्रयत्न केले जात आहे. महाराष्ट्र संतांची, प्रबोधनाची, फुले, शाहू,आंबेडकरांच्या विचारांची भूमी आहे. त्यामुळे या भूमीला अबाधित राखू. सदावर्तेंचा कुटील डाव यशस्वी होऊ देणार नाही.