-निवडीनंतर विविध संस्था व पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव; संस्थेतर्फे सत्कार
आळंदी (अर्जुन मेदनकर) : विश्वकर्मा संरक्षण कामगार सहकारी पतसंस्था मर्यादित, पुणे या संस्थेच्या चेअरमनपदी बाळासाहेब मुंगसे पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्रीमती नूतन भोसले यांनी कामकाज पाहिले.
या संस्थेत एकूण २१ संचालक आणि दोन तज्ज्ञ संचालक असे २३ सदस्यांचे संचालक मंडळ आहे. चेअरमनपदासाठी बाळासाहेब मुंगसे पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती नूतन भोसले यांनी केली. निवडीनंतर बाळासाहेब मुंगसे पाटील यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. विविध संस्था, पदाधिकारी आणि मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. तसेच संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. आळंदी, केळगाव आणि पंचक्रोशीतील विविध संस्था व पदाधिकाऱ्यांनी मुंगसे पाटील यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आळंदी एसडीव्ही-१० ग्रुपच्या वतीने अर्जुन मेदनकर यांनीही त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.