-नगराध्यक्ष पंडित दादा देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन; खेळाचे महत्त्व, शारीरिक तंदुरुस्ती आणि विद्यार्थ्यांच्या सहभागाबाबत मार्गदर्शन
चिखली (महिंद्रा हिवाळे) : तालुका क्रीडा संकुल, चिखली येथे जिल्हास्तरीय थांग-ता मार्शल आर्ट स्पर्धेचा दिमाखात शुभारंभ करण्यात आला. नगराध्यक्ष पंडित दादा देशमुख यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
या कार्यक्रमाला भाजपा शहराध्यक्ष (अल्पसंख्याक) नईम शब्बीर सौदागर, सागर पुरोहित, दत्ता सुसर, अमित दीनदयाल वाधवानी, विजय वाडेकर, दीपक सेठ वाधवानी, राम बनसोडे, बंडू सोडे, सिद्धू ठेंग आणि प्रशांत देशमुख उपस्थित होते. तसेच क्रीडा व शिक्षण क्षेत्रातील मान्यवर नरेंद्र कुटे, सौ. वडुळकर मॅडम, गणेश जाधव, सय्यद सिराज, भास्कर बंगाडे, विष्णू वायाळ, सय्यद अदनान आदींची उपस्थिती होती. थांग-ता जिल्हा सचिव फहीम सौदागर यांनी थांग-ता या मार्शल आर्ट खेळाचे महत्त्व आणि त्याचे नियम याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी नगराध्यक्ष पंडित दादा देशमुख यांनी खेळाचे महत्त्व, शारीरिक तंदुरुस्ती, खेळातील आरक्षण तसेच विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्राकडे वळण्याची आवश्यकता याबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सय्यद सिराज यांनी केले. त्यांनी प्रास्ताविक मनोगतही व्यक्त केले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी आणि बक्षीस वितरणासाठी प्रदीप घोरपडे, गणेश जाधव, सुष्टी खंडागळे, मेहरफात नुरी आणि मोहम्मद अयान यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचे आणि उपस्थितांचे आयोजकांच्या वतीने आभार मानण्यात आले.