-शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज; शेजारील दुकानांचेही नुकसान, जीवितहानी नाही
चिखली (महिंद्र हिवाळे) : चिखली बसस्थानकाजवळ असलेल्या सागर वाघ यांच्या सातबारा ऑनलाइन कॉम्प्युटर सेंटरला मंगळवार, दि. १३ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास आग लागली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असून, या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले आहे. आगीमुळे शेजारील दुकानांचेही नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
आगीची तीव्रता लक्षात घेता परिसरात एकच धावपळ उडाली. या घटनेत सागर वाघ यांच्या दुकानाचे मोठे नुकसान झाले असून, शेजारील दुकानांनाही आगीची झळ बसली. दरम्यान, आग आटोक्यात आली असून, आगीचे नेमके कारण आणि नुकसानीचा तपशील अद्याप स्पष्ट झालेला नाही.