आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील अजिंक्य डी वाय पाटील ग्रुप लोहगाव मध्ये अजिंक्य वन महोत्सव २०२२ अंतर्गत पर्यावरण संवर्धन अभियान उत्साहात आयोजित करण्यात आले.
या अभियान अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हरणतळे वस्ती लोहगाव येथे उंबर, कडूनिंब, अशोका, वड, पिंपळ, चिंच, जांभूळ अशी विविध वन औषधी वनस्पतींची तसेच अजिंक्य डी वाय पाटील कॅम्पस लोहगाव येथे ५१ बेल वृक्षाची लागवड करण्यात आली. अजिंक्य वन महोत्सव उपक्रमासाठी महाविद्यालयाच्या संचालिका डॉ कमलजीत कौर, प्राचार्य डॉ फारुख सय्यद, तंत्रनिकेतन समन्वयक डॉ नागेश शेळके, विविध विभागांचे विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मार्गदर्शन करीत परिश्रम घेतले. संस्थेचे उपाध्यक्ष डॉ एकनाथ बी खेडकर, विश्वस्त डॉ सुशांत पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक करून प्रोत्साहन दिले. अजिंक्य वन महोत्सव २०२२ पर्यावरण संवर्धन अभियान यशस्वीतेसाठी ग्रीन अवनी फाउंडेशन, आळंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हरणतळे वस्ती लोहगाव शिक्षिका तृप्ती तोडकर यांचे सहकार्य लाभले. अजिंक्य डी वाय पाटील टेक्निकल कॅम्पस लोहगावचे राष्ट्रीय सेवा योजना युनिट ए १५७ चे कार्यक्रम अधिकारी दिलीप घुले व सर्व स्वयंसेवक आणि विद्यार्थी यांनी अजिंक्य वन महोत्सव यशस्वीतेस परिश्रम घेतले.