BULDHANAVidharbha

सव्वाकोटींचे होमिओपॅथी भवन साकारणार!

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) –  होमिओपॅथी भवनसाठी बुलडाणा शहरात कायमस्वरूपी भूखंड उपलब्ध करून देण्याची एकमुखी मागणी बुलडाणा होमिओपॅथी डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने आमदार संजय गायकवाड यांच्याकडे करण्यात आली आहे.  दरम्यान, आमदार गायकवाड यांनी पालिकेकडून भूखंड उपलब्धतेसह सव्वा कोटी बांधकामासाठी देणार असल्याचे आश्वासित केले. होमिओपॅथी भवन साकारले तर ते महाराष्ट्रातील पहिले ठरणार आहे.

आमदार संजय गायकवाड यांची शिवसेनेच्या संपर्कप्रमुख पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. दरम्यान, होमिओपॅथी भवन साठी बुलडाणा शहरात कायमस्वरूपी भूखंड उपलब्ध करून देण्याची एकमुखी मागणी करण्यात आली. असोसिएशनचे शिष्टमंडळ म्हणाले की, शहरात जवळपास ७० होमिओपॅथी डॉक्टर सेवा देत आहेत. डॉक्टर आरोग्य तसेच सामाजिक बांधिलकी जपत जोपासत आहेत. बुलडाणा आणि जवळपासच्या परिसरातील गोरगरीब रुग्णांना होमिओपॅथीचा मोफत उपचार देण्याचा संघटनेचा मानस आहे. यासाठी धर्मार्थ होमिओपॅथी दवाखाना साकारण्याकरिता होमिओपॅथी भवन उपलब्ध होण्याची गरज आहे. या भवनाच्या जागेचा आणि भवनाचा उपयोग केवळ मोफत नियमित होमिओपॅथी निदान व उपचार सेवा,आरोग्य शिबिर, व सामाजिक उपक्रमासाठी होईल. या होमिओपॅथी भवनसाठी कायमस्वरूपी भूखंड उपलब्ध करून देण्यात यावा,अशी एकमुखी मागणी असोशियनने आमदार संजय गायकवाड यांना केली आहे.

दरम्यान आमदार गायकवाड यांनी आश्वासन दिले आहे. यावेळी असोसिएशनचे डॉ अजय ढगे डॉ. अविनाश महाजन, डॉ. दुर्गासिंग जाधव, डॉ.नीलिमा जाधव, डॉ. सागर जोशी, डॉ दिपाली जोशी, डॉ.गजानन सुरडकर, डॉ वसू डॉ. रसिका वानखडे, डॉ. दिपाली बारोटे, डॉ. अभिजीत पाटील, डॉ.पवन बजाज, डॉ उमेश जाधव, डॉ दीपक बढे,डॉ अरुणा गोरे, आदि डॉक्टरांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!