देऊळगावराजा (तालुका प्रतिनिधी) – केंद्र व राज्य शासनपुरस्कृत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद बुलढाणा व श्री गजानन महाराज कृषी व शैक्षणिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे उंबरखेड, तालुका देऊळगाव राजा येथे जलजीवन मिशन कार्यक्रमा अंतर्गत दिनांक २४ डिसेंबररोजी सकाळी ९ वाजता सौ. शीलाताई कायंदे, सरपंच तथा अध्यक्ष ग्राम पोषण पाणीपुरवठा व स्वच्छता समिती यांच्या अध्यक्षतेखाली गटनेते रमेश डोईफोडे, उपसरपंच मुन्नाबी मोहम्मदबेग मोगल, राजेंद्र कायंदे अध्यक्ष तंटामुक्ती समिती, डी. आर. चेके ग्रामपंचायत सचिव यांच्यासह संस्था प्रतिनिधी रुपेश खरात (इंजीनीयर), गजानन काकड (वरिष्ठ समाजशास्त्रज्ञ) व छगन खरात यांच्या उपस्थितीत लोकवर्गणीचा शुभारंभ करण्यात आला.
प्रास्ताविकपर बोलताना रुपेश खरात यांनी संस्थेची ओळख व जलजीवन मिशन कार्यक्रमाची माहिती समजावून सांगितली व तदनंतर छगन खरात यांनी जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत होणार्या नळ पाणीपुरवठा योजना संबंधी सविस्तर विस्तृत अशी माहिती देऊन १० टक्के लोक वर्गणी बाबतचे महत्त्व समजावून सांगितले. सभेमध्ये रामदास कायंदे यांनी ५०० रुपये लोकवर्गणी देऊन लोकसहभागाला सुरुवात केली व सभेमध्ये लोकसहभागाचे पुढील नियोजन करण्यात आले.
शेवटी ग्रामपंचायत सचिव डी.आर. चेके यांनी ग्रामस्थांचे आभार व्यक्त करून सभा संपन्न झाली. सभेला रामभाऊ कायदे, दिगांबर कायदे, खंडूजी कायंदे, भगवान कायंदे, शिवराम मांटे, भीमराव कंकाळ सह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.