‘मनोरमा’चे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार डॉ. मोरे, समेळ, देशमुख यांना जाहीर
सोलापूर : मनोरमा सोशल फाउंडेशन संचलित मनोरमा साहित्य मंडळी सोलापूर व महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा पश्चिम सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मनोरमा साहित्य पुरस्कार डॉ. सदानंद मोरे, अशोक समेळ, श्रीकांत देशमुख आदी दहा जणांना हा पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहिती श्रीकांत मोरे यांनी दिली.
या पुरस्काराचा वितरण सोहळा बुधवार, २८ डिसेंबर २०२२ रोजी शिवछत्रपती रंगभवन येथे होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे भूषविणार आहेत. माजी आमदार उल्हास पवार यांच्या हस्ते व सहकार आयुक्त अनिल कवडे, महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळीचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, सारथी पुणे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे, मसाप पुणे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या पत्रकार परिषदेप्रसंगी शोभा मोरे, अस्मिता गायकवाड, डॉ कविता मुरुमकर, प्रा.माधव कुलकर्णी, संतोष सुरवसे, कल्याण शिंदे,राजेंद्र भोसले, प्रा.दत्ता घोलप यांची उपस्थिती होती.
साहित्य जीवन गौरव पुरस्काराचे मानकरी
डॉ. सदानंद मोरे, समग्र साहित्य पुणे, मनोरमा साहित्य गौरव पुरस्कार अशोक समेळ, समग्र साहित्य ठाणे, मनोरमा साहित्य शासकीय पुरस्कार श्रीकांत देशमुख नांदेड, राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार डॉ. मीनाक्षी पाटील (कविता) मुंबई, डॉ. दादा गोरे औरंगाबाद, उर्मिला आगरकर (भाषा) सोलापूर, साहित्यसेवा पुरस्कार दत्ता गायकवाड (चरित्र) सोलापूर, प्रा.सीताराम सावंत (कथा) सांगोला, पत्रकार पुरस्कार प्रशांत जोशी, अश्विनी तडवळकर सोलापूर, साहित्य पुरस्कार प्रा. राजेंद्र शेंडगे (कविता) सोलापूर यांना पुरस्कार देण्यात येणार आहेत.
—————-