– प्रत्येक घरास प्रतिमाणसी ५५ लीटर पाणी पुरवठा होणार!
सोलापूर (संदीप येरवडे) – सोलापूर जिल्हा परिषदेच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ७०२ कामांना प्रत्यक्ष कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे आहे. उर्वरित निवेदनादेखील मंजुरी देण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. ‘हर घर नल से जल’ २०२४ अखेर प्रत्येक घरास नळाव्दारे ५५ लि. प्रति माणशी प्रतिदिनी प्रमाणे पाणी पुरवठा करण्याचे प्रस्तावित आहे. यामध्ये पूर्ण व प्रगतीपथावरील पाणी पुरवठा योजनांमध्ये सुधारणा करुन त्या योजनाव्दारे ५५ लिटर प्रतिमाणशी प्रतिदिनी प्रमाणे पाणी पुरवठा करणे व ५५ लिटर प्रमाणे नविन योजना प्रस्तावित करण्यात आलेले आहे. सन २०२२-२३ च्या प्रस्तावित आराखड्याची किंमत रुपये ८१८ कोटी ५८ लाख असून हा आराखडा मान्यतेसाठी केंद्र शासनास सादर करण्यात आलेले आहे.
जिल्ह्यातील एकूण ५ लाख ८६ हजार ६४५ कुटुंबापैकी मार्च २०२२ अखेर ४ लाख ७८ हजार ८७१ कुटुंबाच्या नळ जोडण्या संकेतस्थळावर नोंदीत करण्यात आलेल्या असून, सन २०२२-२३ या वर्षीचे ४४ हजार ५५७ नळ जोडण्यांचे उद्दिष्ट आहे. साध्य ३४ हजार ४५ इतक्या नळ जोडण्या संकेतस्थळावर नोंदीत करण्यात आलेल्या आहेत. उर्वरीत नळजोडणी मार्च २०२३ अखेर पूर्ण करण्यात येतील. जल जीवन मिशन कार्यक्रम सन २०२२-२३ च्या कृती आराखडामध्ये जि.प. ९३९ योजनांचा समावेश होता ५.०० कोटी वरील योजना हर जल झालेल्या योजना इ. वगळून आता ८५४ योजना करावयाचा असून आज अखेर निविदास्तर -८४६ व कार्यारंभ आदेश ७०२ योजनांना दिले आहेत. उर्वरित काम प्रगतीपथावर आहेत. केंद्र शासन व राज्य शासनाकडील प्रत्येकी ५० टक्के या प्रमाणात निधीची १० कोटी निधीची मागणी केलेली आहे.
जल जीवन मिशन योजनेअंतर्गत सध्या ज्या गावांमध्ये एससी एसटी लोकसंख्या अधिक आहे, त्या गावातील कामांना प्राधान्य क्रमाने पहिला मंजुरी दिलीा जात आहे. याबरोबरच आणि गावांमध्ये सिमेंट रस्ते झाले त्यामधून पाईपलाईन करण्यात येणार आहे. तरी खराब झालेले रस्तेदेखील दुरुस्ती केली जाणार आहे.
– डी. एच. कोळी, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा