– राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मंत्री चंद्रकांत पाटलांचा निषेध
बिबी (प्रतिनिधी) – राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या बेताल वक्तव्याबद्दल, व छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दलच्या संतापजनक वक्तव्याबद्दल, आज बिबी येथील शिवप्रेमींनी बाजारपेठ कडकडीत बंद ठेवून आपला निषेध व्यक्त केला. शिवप्रेमींच्या आवाहनाला सर्व व्यावसायिकांनी जोरदार प्रतिसाद दिला.
राज्यपाल कोश्यारी व मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या जबाबदार व्यक्तींनी महापुरुषांबद्दल असली वक्तव्ये करणे हे अशोभनीय असून, अशा वक्तव्यांमुळे नेहमी महाराष्ट्रामध्ये असंतोष निर्माण होत आहे. तरी राज्य सरकारने या प्रकरणाची दखल घेऊन यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बिबी येथील शिवप्रेमी, नागरिक व व्यापारीवर्गाने केली. आजच्या बंदला विविध सर्व व्यापारीबंधूंनी भरभरून असा प्रतिसाद दिला. या बंदमध्ये संतोष बनकर, आकाश बनकर, स्वप्निल बनकर, कैलास मोरे, उमेश राठोड, अतिश तायडे, सचिन रणमळे, शेख इमरान, भास्कर खुळे, माधव डुकरे, राजू खारडे, गणेश आटोळे, धनराज कायंदे यांच्यासह बहुसंख्य व्यापारी बंधू, विविध राजकीय पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सहभाग घेतला होता.
—————–