आरोग्य विभागातील कंत्राटी डेटा एण्ट्री ऑपरेटरवर आली उपासमारीची वेळ!
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – आरोग्य विभागात कंत्राटी पद्धतीने डेटा एण्ट्री ऑपरेटर असलेल्या तरुण-तरुणींना तीन महिन्यांपासून वेतनच न मिळाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली असून, या कर्मचार्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. पुणे येथील यशस्वी अॅकॅडमी ऑफ स्कील या संस्थेचे हे कर्मचारी असून, ही संस्था या तरुण-तरुणींना मासिक ९ हजार रुपये इतके अल्पवेतन देते. गेल्या वर्षभरात त्यांच्या वेतनातही वाढ न झाल्याने या कर्मचार्यांत तीव्र संताप आहे. याबाबत या तरुण-तरुणींनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन दिले असून, वेतन मिळवून देण्यासाठी सहाय्य करावे, अन्यथा कामबंद आंदोलनाचा इशारादेखील देण्यात आलेला आहे.
सविस्तर असे, की आरोग्य विभाग, जिल्हा परिषद बुलढाणा येथे यशस्वी अकॅडमी ऑफ स्कील पुणे या कंपनीमार्फत डेटा एन्ट्री ऑपरेटर ही पदे १४ सप्टेंबर २०२१ रोजी भरण्यात आली आहेत. गेल्या दोन महिन्यांचे विद्यावेतन अजून लांबणीवर असून, त्यात २१ सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर ही महिनेदेखील समाविष्ट आहेत. म्हणजे, सलग तीन महिन्यांपासून या कर्मचार्यांना पगारच मिळालेला नाही. या डेटा एन्ट्री ऑपरेटर यांना विद्यावेतनापोटी दरमहा ९ हजार रुपये दिले जात आहेत. त्यातच डिसेंबर महिनासुद्धा संपत आलेला आहे. तरीदेखील त्यांना वेतन मिळालेले नाही.
या शिवाय, यशस्वी अकॅडमी ऑफ स्कील, पुणेतर्पेâ एक वर्ष उलटूनसुद्धा विद्यावेतनामध्ये वाढ झाली नाही, आणि कधीही वेळेवर विद्यावेतन होत नाही, त्यामुळे कर्जबाजारी, व उपासमारीची वेळ येते, तरी आरोग्य विभागात कामाला जाताना जाण्या-येण्यासाठी पैसाची गरज भासते, डिव्हिजनल मॅनेजर ज्योती शेळके यांना विचारले असता, त्या उडवाउडवीची उत्तरे देतात. नाहीतर वॉर्निंग लेटर, टर्मिनेट लेटरच्या धमक्या मिळतात, हा मानसिक व विद्यावेतन न झाल्याने होणारा त्रास थांबला पाहिजे, अशी मागणी बुलढाणा जिल्ह्याचे डेटा एन्ट्री ऑपरेटर यांनी या निवेदनाद्वारे केली आहे. तरी विद्यावेतन लवकर झाले पाहिजे, अशी अपेक्षा कार्यरत डेटा एन्ट्री ऑपरेटर यांनी करून, अन्यथा कामबंदचा इशारादेखील दिलेला आहे.
—————
—निवेदन वाचण्यासाठी येथे क्लीक करा