आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील विविध सेवाभावी संस्था, पक्ष संघटनांसह भाजपचे वतीने स्व. माजी उपमुख्यामंत्री गोपीनाथ मुंडे यांची जयंती अभिवादन करीत साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्व.गोपीनाथ मुंडे यांचे प्रतिमेचे पूजन,पुष्पहार अर्पण आणि पुष्पांजली अर्पण करीत साजरी केली.
या प्रसंगी आळंदी शहर भाजपचे संघटन सरचिटणीस भागवत काटकर, शिवा संघटना आळंदी शहर अध्यक्ष सदाशिव साखरे, आळंदी जनहित फाउंडेशन कार्यध्यक्ष अर्जुन मेदनकर, ज्ञानेश्वर थोरवे, एस. एस. आघाव, दिनेश खेडेकर, काशिनाथ गिते, आळंदी शहर झोपडपट्टी सुरक्षा दल अध्यक्ष संतोष सोनवणे, राजू दराडे, उत्तर भारतीय आघाडी आळंदी शहर अध्यक्ष योगेश प्रतापशिंग आदी उपस्थित होते.
यावेळी आळंदी शहर भाजपचे नेते भागवत काटकर म्हणाले, स्व. मुंडे साहेब असते तर राज्यातील राजकीय चित्र वेगळे असते. त्यांनी बहुजन समाजासह महाराष्ट्रासाठी मोठे योगदान दिले आहे. राज्यातील सामान्य कार्यकर्ता ते नेता असा संघर्षमय प्रवास करणारा नेता असेही काटकर यांनी सांगितले. शिवशंकर आघाव, सदाशिव साखरे, माऊली थोरवे यांनी स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला.