साेलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – केगांव येथील एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रिकल विभागातील ७ विद्यार्थ्यांची ‘विश्वजीत कॅपॅसिटर्स’ या नामांकित कंपनीमध्ये निवड झाली आहे. यामध्ये ओंकारेश्वर बिक्कड, नवनाथ हाके, ज्ञानेश्वरी मठ, सुशांत पाखरे, अवंती शिंदे, शिवराज माळी, सुप्रिया वावरे या इलेक्ट्रिकल विभागातील विद्यार्थी, विद्यार्थिनींचा समावेश आहे.
विश्वजीत कॅपॅसिटर्स ही कंपनी शंट कॅपेसिटर,उच्च व्होल्टेज शंट कॅपेसिटर, शंट पॉवर कॅपेसिटर, 25 KVAR शंट कॅपेसिटर, उच्च व्होल्टेज शंट कॅपेसिटर, सबस्टेशन कॅपेसिटर बँक, पॉवर कॅपेसिटर, सिंगल आणि थ्री फेज पॉवर कॅपेसिटर,1 फेज पॉवर कॅपेसिटर, इत्यादी उपकरणे उत्पादित करते. सिंहगड मध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी परिश्रम घेतले जातात व प्लेसमेंटसाठी आवश्यक त्या गोष्टीचे तज्ज्ञ प्राध्यापांकाकडून मार्गदर्शन केले जाते. सिंहगड संस्थेमध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना जगातील नामांकित कंपनीमध्ये सहजरित्या प्लेसमेंटची संधी प्राप्त होते. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालय नेहमीच विविध उपक्रम राबवत असते.
या यशाबद्दल सिंहगड संस्थेचे सहसचिव संजय नवले, प्राचार्य डॉ.शंकर नवले, उपप्राचार्य डॉ. रवींद्र व्यवहारे व डॉ.शेखर जगदे,ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. विकास मराठे,इलेक्ट्रिकल विभागप्रमुख प्रा. विजय बिरादार, या प्लेसमेंट ड्राईव्हसाठी इलेक्ट्रिकल विभागाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट समन्वयक प्रा. बालाजी बेद्रे यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच यशस्वी विद्यार्थ्यांचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.