AalandiPachhim Maharashtra

ओवी ज्ञानेशाची’ राज्यस्तरीय स्पर्धेत नरसिंह पांचाळ प्रथम

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : ज्ञानेश्वरी ग्रंथावर आधारीत ज्ञानेश्वरीतील वैज्ञानिक ओव्यांची राज्यस्तरीय ओवी ज्ञानेशाची स्पर्धा परिक्षा २०२२ ही स्पर्धा गेल्या दोन वर्षापासुन बाळासाहेब बोडखे आयोजित करीत आहेत. या वर्षीचे स्पर्धेत आळंदी येथील नरसिंह पांचाळ यांना ह.भ.प. सुदर्शन महाराज सांगवीकर, बीड जिल्हा वकिल संघाचे अध्यक्ष अॅड एस.एम. नन्नवरे यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचे बक्षीस देवून गौरविण्यात आले. या स्पर्धेत महाराष्ट्रातील एकुण ५६ स्पर्धेकांनी सहभाग घेतला. यामध्ये आळंदी येथील नरसिंह पांचाळ यांना प्रथम क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले.

जगदिश नरवडे आष्टी यांना द्वितीय क्रमांक आणि श्रीहरी पुरी आष्टी, योगेश गर्जे खिळद यांना तृतिय क्रमांकाचे बक्षिस देण्यात आले. या स्पर्धेतील आणखी तीन स्पर्धेकांना उत्तेजनार्थ बक्षिस देवून गौरव करण्यात आला. त्यामध्ये बीड येशील कुमारी तनुजा मोरे, सागर गायकवाड श्रीगोंदा, ज्योती गर्जे खिळद यांना उत्तेजनार्थ बक्षिस देण्यात आले. प्रथम क्रमांक पटकावणा-या स्पर्धेकास रोख पाच हजार रुपये, ज्ञानेश्वरी ग्रंथ, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र देवून गौरविण्यात आले. द्वितीय क्रमांक साठी रोख तीन हजार रुपये, ज्ञानेश्वरी ग्रंथ, सम्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र देवून गौरविण्यात आले, तृतिय क्रमांक साठी दोन हजार रुपये, ज्ञानेश्वरी ग्रंथ सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र देवून गौरविण्यात आले. उत्तेजनार्थ बक्षिस पटकावणा-या स्पर्धेकास रोख रक्कम एक हजार, ज्ञानेश्वरी सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपम देवून गौरविण्यात आले. या कार्यक्रमात आष्टी येथील नामांकित विधिज्ञ परशुराम नरवडे (नाना) यांनी १२ अभ्यासु स्पर्धेकांना अर्थासह ज्ञानेश्वरी ग्रंथ सप्रेम भेट दिले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वयोवृध्द, तपोवृध्द ह.भ.प. गुरुवर्य सुदर्शन महाराज सांगवीकर होते. या प्रसंगी बीड जिल्हा वकिल संघाचे अध्यक्ष एस. एम. ननवरे, निष्णात मध्यस्थीकार अँड एन. एन. साबळे, प्रा. महादेव साबळे, बलभिमराव सुंबरे, गटविकास अधिकारी शेवगांव दहिफळे साहेब, ह.भ.प. निळकंठ तावरे महाराज केळसांगवी, येडेश्वरी संस्थानचे महंत ह.भ.प. आजीनाथ महाराज खिळदकर, वारकरी संप्रदायीक गायक बाबासाहेब गर्जे, शाहू बँकेचे संचालक अँड पि. बी. भोसले उपस्थित होते. बीड जिल्हा वकिल संघाचे अध्यक्ष अँड एस.एम. ननवरे, ह.भ.प. श्रीहरी पुरी महाराज, ह.भ.प. निळकंठ महाराज, प्रा. महादेव साबळे, अँड एन. एन. साबळे, महंत आदिनाथ महाराज यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धेक योगेश गर्जे आणि आळंदी येथीत प्रथम क्रमांक विजेते नरसिंह पांचाळ यांनी मनोगत व्यक्त केले. या स्पर्धेचे आयोजक  बाळासाहेब बोडखे यांनी प्रस्ताविक केले. ते म्हणले. ज्ञानेश्वरीतील विज्ञानाचा अभ्यास मानवी कल्याणासाठी व्हावा. ज्ञानेश्वरी ग्रंथाचा वैज्ञानिक अंगाने देखील अभ्यासा व्हावा. ज्ञानेश्वरी वाचावी एवढेच पुरेशे नसुन ज्ञानेश्वरी अभ्यासणे आवश्यक आहे. अनेक शोध पाश्चिमात्यांनी लावल्याचे जाहीर केल्यावर आपल्या कडील तज्ज्ञ ओरडतात की, हे तर आमच्या ज्ञानेश्वरीत माउलींनी १२ व्या शतकात सांगीतले आहे. मग प्रश्न असा आहे की, ते आपण का अभ्यासले नाही. ते अभ्यासले जावे यासाठी ओवी ज्ञानेशाची स्पर्धा परिक्षा आयोजित करण्यात आलेली आहे. तरी याचा सर्वांनी नित्य जीवनात अभ्यास करावा असे आवाहन यांनी केले.

कार्यक्रमासाठी उपसरपंच भाउसाहेब गर्जे, डॉ. श्रीराम गर्जे, बाळासाहेब गर्जे, दनु गर्जे, अशोक गर्जे, शहादेव गर्जे, किरण गर्ने, अंबादास गर्जे, अनिल वनवे, रामा गर्जे, नारायण गोल्हार, बाबासाहेब गर्जे, सुरेश आघाव, सचिन गर्जे, इंजि. अमोल बोडखे, भागवत बोडखे, नितीन बोडखे, नवनाथ गर्जे, भाऊसाहेब साळुंके, पाटण येथील वेदमुर्ती आडकर देवा यांनी सहकार्य केले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आयोजक बाळासाहेब बोडखे, वागभूषण ह.भ.प. देविदास महाराज, पांडुरंग गर्जे यांनी विशेष परिश्रम घेत ज्ञानेश्वरीवरील स्पर्धा यशस्वी केली. या वर्षीचे स्पर्धेत आळंदी येथील नरसिंह पांचाळ यांनी प्रथम क्रमांक मिळवल्या बद्दल आळंदी जनहित फाउंडेशनच्या वतीने कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी त्यांचे अभिनंदन केले. सुत्रसंचालन वागभुषण ह.भ.प. देविदास महाराज यांनी केले. याप्रसंगी गणेश कुलकर्णी, प्रा. नरवडे अंमळनेर, प्रा. योगेश देशपांडे आष्टी, तसेच खिळद चे तरूण उपस्थित होते. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!