BULDHANAHead linesPolitical NewsPoliticsVidharbha

खा. प्रतापराव जाधव व आ. प्रसाद लाड यांना सदबुद्धी मिळो..!

गाेळ्या संपल्या असतील तर केळकर डॉक्टरकडून गोळ्या घ्या-शिवसैनिकांची संतप्त भावना

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – विधानपरिषद सदस्य प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला, असे बावळट विधान केले होते. याचा सर्वस्तरातून निषेध व्यक्त केला जात असताना बुलढाणाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी आमदार प्रसाद लाड यांनी केलेले वक्तव्य हे आक्षेपार्य नसल्याचे विधान केले. त्यानी लाड यांचे समर्थन केल्याने शिवप्रेमीमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. केळवद येथील गावात आमदार प्रसाद लाड व खासदार प्रतापराव जाधव या दोघांनाही सदबुद्धी मिळावी, अशी प्रार्थना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर करण्यात येवून, शिवप्रेमीनी तीव्र निदर्शने केली. याप्रसंगी नारायण वाणी, नंदुआप्पा बोरबळे, गणेश यंगढ, अशोक मोहिते, धनु पाटील, गोपाल वाघमारे, ज्ञानदेव काळेकर, दामू जाधव, अशोक पांढरे, अशोक भोलाने, जगन्नाथ आप्पा आदी उपस्थित होते.

पहा संतप्त प्रतिक्रिया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!