चिखली (तालुका प्रतिनिधी) – जिल्ह्यामध्ये सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे घोंगावू लागले आहे. निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे. राजकीय व सामाजिक सलोखा बिघडू नये, गावातील वातावरण चांगले रहावे, कायदा व सुव्यवस्था टिकून रहावी, निवडणुकीसाठी उमेदवाराकडून होणार्या खर्चाची बचत व्हावी, यासाठी चिखली विधानसभा मतदारसंघातील ज्या गावांमध्ये निवडणूका आहेत, त्या गावातील नागरिकांनी ‘ग्रामपंचायतच्या निवडणुका अविरोध करा आणि एकावन्न लाखाचा निधी मिळवा’ असे जाहीर आवाहन आमदार सौ श्वेताताई महाले पाटील यांनी महाले एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
चिखली विधानसभा मतदारसंघातील २८ गावांमध्ये सद्या ग्रामपंचायत निवडणुकांचे पडघम वाजत आहे. या निवडणुकांमध्ये आपसातील मैत्री आणि सलोख्याचे संबंध मोठ्या प्रमाणात ताणले जाऊन गावातील एकोपा भंग होण्याची दाट शक्यता असते. भावाभावात कलह निर्माण होऊन मने कायम स्वरुपी कलुशित होतात. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या एवढ्या टोकाच्या होत नाही तेवढ्या ग्रामपंचायत च्या निवडणुक टोकाच्या होऊन अनेक ठिकाणी गावातील शांतता भंग होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न सुद्धा निर्माण होत असतो. तसेच गावातील सद्भाव आणि सलोखा भंग होतो .त्यामुळे गावातील सर्व पक्षांनी एकत्र बसून सर्व संमतीने व सर्वांना समान संधी उपलब्ध करुन देऊन होणार्या निवडणूका अविरोध करण्याचे आवाहन करून ज्या गावातील निवडणुका अविरोध होईल त्या गावांना त्यांच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात एकावन्न लाखाचा निधी उपलब्ध करुन देण्याचे वचन आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी यावेळी दिले आहे.
मागील निवडणूकीत अविरोध झालेल्या ग्रामपंचायतीना निधी देऊन शब्द पाळला!
मागील ग्रामपंचायतच्या निवडणूकीत ही आम्दार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी ग्राम पंचायत निवडणुका अविरोध करण्याचें आवाहन केले होते. त्यावेळी त्यांनी २१ लाखाचा निधी अविरोध होणार्या गावांना देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांच्या आवाहनानुसार चिखली विधानसभेतल्या पाच ग्रामपंचायत अविरोध अविरोध झाल्याने त्या ग्रामपंचायती २१ लाखाच्या मानकरी ठरल्या होत्या. त्यात चिखली तालुक्यातील चांधई, खोर, मालगणी आणि बुलढाणा तालुक्यातील पळसखेड भट आणि सिंदखेड या पाच ही ग्रामपंचायती २१ लाखाच्या बक्षिसाच्या मानकरी ठरल्या होत्या त्या प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये विविध शासकीय योजनांचा निधी खेचून आणून त्या ठिकाणची काही कामे सुरू झाली तर काही कामे सुरू होणार असल्याने आ. सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी दिलेला शब्द एक दीड वर्षातच पूर्ण केला आहे.
—————