Breaking newsBULDHANAChikhaliMaharashtraVidharbha

BREAKING NEWS! जिल्हा कृषी कार्यालयात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा राडा!

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – राज्य सरकारने घोषणा करून आणि पीकविमा कंपन्यांना तंबी देऊनही बुलढाणा जिल्ह्यात कार्यरत असलेल्या एग्रिकल्चर इन्सुरन्स कंपनी अर्थात एआयसीने शेतकर्‍यांच्या खात्यात हास्यास्पद पीकविमा नुकसान भरपाई जमा केली. त्यामुळे संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर व शेतकर्‍यांनी शहरातील अजिंठा मार्गावरील कृषी कार्यालय गाठले. त्यांनी जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या कक्षातच ठिय्या मांडून अधिकार्‍यांसह कंपनीच्या अधिकार्‍यांना जाब विचारला. उशिरापर्यंत हे आंदोलन सुरू होते. शेतकर्‍यांचे अर्ज भरून त्यांना भरीव विमा भरपाई द्या, अन्यथा मुंबईत येऊन तीव्र आंदोलन केले जाईल, असा खणखणीत इशारा यावेळी तुपकरांनी दिला. दरम्यान, रात्री उशिरा एआयसी कंपनी सकारात्मक प्रतिसाद देत नसल्याने रविकांत तुपकर यांनी कंपनीचे समन्वयक दिलीप लहाने यांना बुलढाणा पोलिस ठाण्यात नेले, व पोलिसांत तक्रार देऊन गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. पोलिस याप्रकरणी वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेत होते.

रविकांत तुपकर यांच्या मुंबईतील जलसमाधी आंदोलनापुढे राज्य सरकार झुकले होते. सरकारने पीकविमा कंपन्यांना तंबी देत, तातडीने नुकसान भरपाई देण्यास सांगितले होते. त्यामुळे पीकविमा कंपन्यांनी पैसे जमा करण्यास सुरुवात केली होती. परंतु, शेतकर्‍यांच्या खात्यात जमा केलेली रक्कम तुटपुंजी असल्याने रविकांत तुपकर चांगलेच संतापले. त्यांनी कार्यकर्ते व शेतकर्‍यांसह थेट बुलढाणा जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय गाठत ठिय्या आंदोलन पुकारले. तसेच, पीकविमा कंपनीच्या अधिकार्‍याला धारेवर धरले. यामुळे कार्यालयात काही काळ तणावाचे वातावरण होते. तुपकर यांच्या अरबी समुद्रात जलसमाधी आंदोलनामुळे पीकविम्यापोटी जिल्ह्यासाठी १०३ कोटी रुपये मंजूर झाले. परंतु, पीकविमा कंपन्या अतिशय तुटपुंजी रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करत असल्याने शेतकर्‍यांच्या संयमाचा उद्रेक होण्याची स्थिती निर्माण झालेली आहे.

तुपकर हे आंदोलन संपवून मुंबईतून बुलढाण्यात परत येत नाही तोच, पीकविम्याची रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होणे सुरू झाले. मात्र, ही रक्कम तुटपुंजी व शेतकर्‍यांची क्रूर चेष्टा करणारी असल्याचे निदर्शनास आले. शेतकर्‍यांनी ही बाब सोमवारी तुपकरांच्या निदर्शनास आणून दिली. यामुळे संतप्त तुपकरांनी दुपारी १ वाजता शेतकरी व कार्यकर्त्यांसह अजिंठा मार्गावरील कृषी कार्यालय गाठले. त्यांनी जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या कक्षातच ठिय्या मांडून जाब विचारला. ‘एआयसी कंपनी’चे जिल्हा समन्वयक दिलीप लहाने यांना तर अक्षरशः धारेवर धरले. तेथूनच वरिष्ठ अधिकार्‍यांना विचारणा केली. पीकविम्याची भरपाई मिळाली नाही तर मुंबई गाठून धडा शिकवला जाईल, असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिलेला आहे.
—————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!