राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने प्रसिद्ध विचारवंत, व्याख्याते प्रा. डॉ. ज्ञानेश्वर गाडे सन्मानित
हिवरा आश्रम, जि. बुलढाणा (प्रतिनिधी) – परिवर्तन सामाजिक संस्था महाराष्ट्रतर्पेâ शैक्षणिक आणि सामाजिक योगदानाबद्दल दिला जाणारा यावर्षीचा राज्यस्तरीय क्रांतिसूर्य महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार हिवरा आश्रम येथील निष्काम कर्मयोगी संत प.पू शुकदास महाराजश्री संस्थापित विवेकानंद आश्रमद्वारा संचालित विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत प्राध्यापक तसेच राज्यातील प्रसिद्ध विचारवंत, व्याख्याते डॉ.ज्ञानेश्वर गाडे यांना पुणे येथील जाहीर कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.
विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात मराठी विषयांचे अध्यापक म्हणून कार्यरत असलेले प्रा. ज्ञानेश्वर गाडे हे ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’सह विविध वृत्तपत्रांचे स्तंभलेखकदेखील आहेत. तसेच, ते राज्यातील ख्यातनाम व्याख्याते, विद्यार्थिप्रिय शिक्षक, विचारवंतदेखील आहे. त्यांचे मराठी, इतिहास आणि लोकप्रशासन या तीन विषयात एम.ए असून त्यांनी बी.एड.एम.फील. व ‘संतसाहित्यातून प्रकटणार्या पर्यावरणीय आणि कृषिनिष्ठ जाणिवांचा अभ्यास’या विषयात पीएच.डी पूर्ण केली आहे. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासबरोबरच विद्यार्थ्यांचे चारित्र्य घडविण्यावर त्यांचा अधिक भर असतो. संतसाहित्य आणि मूल्यशिक्षणविषयक विचार घेऊन ते सतत वृत्तपत्रातून व व्याख्यानातून समाज प्रबोधनाचे कार्य करीत आहेत.
हा पुरस्कार त्यांना पुण्यात पार पडलेल्या क्रांतीज्योती व क्रांतीसूर्य पुरस्कार वितरण सोहळ्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी, भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्तीताई देसाई, श्रीरंग गायकवाड, कवी नारायण सुमंत, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या तसेच कवयित्री दिशा पिंकी शेख, विजय कुर्ले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या पुरस्काराबद्दल विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष पू. आर. बी. मालपाणी, उपाध्यक्ष अशाेक थोरहाते, सचिव संतोष गोरे, सहसचिव आत्मानंद थोरहाते, ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ मीडिया ग्रूपचे मुख्य संपादक पुरुषोत्तम सांगळे, व्यवस्थापकीय संपादक एकनाथ माळेकर, वरिष्ठ सहसंपादक प्राची कुलकर्णी-मानकर, विदर्भ संपादक प्रकाश कथले, पश्चिम महाराष्ट्र संपादक हेमंत चौधरी, मुंबई-कोकण संपादक संजय जोशी, ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ डिजिटलच्या कार्यकारी संपादिका शर्वरी जोशी यांनी प्रा. ज्ञानेश्वर गाडे यांचे अभिनंदन केले आहे.
—————-