KARAJATMaharashtraPachhim Maharashtra

सकल मराठा समाज शिवजयंती उत्सव समिती समन्वयकपदी वैभव लाळगे

कर्जत (प्रतिनिधी):-सकल मराठा समाज शिवजयंती उत्सव समिती समन्वयकपदी बहिरोबावाडी येथील वैभव लाळगे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. कर्जत तालुक्यात दरवर्षी नव्याने समन्वयक नियुक्त केले जातात त्याप्रमाणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या सभागृहात बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली.

कर्जत तालुक्यात दरवर्षी सकल मराठा समाज शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात आयोजित करतात यामध्ये विविध उपक्रम राबविले जातात, याशिवाय विविध ठिकाणी पूजन व भव्य मिरवणुकीचे आयोजन केले जाते. गेली काही वर्षापासून कर्जत येथील छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.  मागील वर्षी धनंजय लाढाणे हे सकल मराठा समाजाचे समन्वयक असताना भव्य क्रिकेट सामने, सामूहिक विवाह सोहळा व विविध व्यावसायिका चा सहभाग असलेला महोत्सव आयोजित करत गेली काही वर्षांपासून नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याची परंपरा कायम राखली होती. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बैठक घेत सर्वानुमते समन्वयक निवड करण्यात आली, व मावळते समन्वयक धनंजय लाढाणे यांनी आपला पदभार वैभव लाळगे यांच्या कडे सर्वानुमते सुुपूर्द केला व त्याचा सत्कार केेला. नुतन समन्वयक वैभव लाळगे यांचे सकल मराठा सामाज्याच्या वतीने अनेकांंनी अभिनंदन केेले आहे यावेळी नितीन तोरडमल, विजय तोरडमल, ऍड जगताप, विजय मोरे, श्रीहरी जगताप, अतुल धांडे, काकासाहेब काकडे, अमित तोरडमल, राहुल नवले, प्रसाद कानगुडे, रमेश गांगर्डे, हिंमत निंबाळकर, महेश शिंदे आदी उपस्थित होते.  वैभव लाळगे हे सकल मराठा समाजाचे सक्रिय कार्यकर्ते असून विविध सामाजिक कार्यातहीी त्यांचा असतो कर्जज शहरा गेली दोन वर्षापासून सुरू असलेलाा सर्वसामाजिक संघटनेच्या श्रमदानातही ते सहभागी असतात तर कर्जत तालुका हरित अभियानाचे ते पदाधिकारी आहेत. मागील वर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात त्यांनी आपला शुभविवाह करत सर्वांसमोर आदर्श ठेवला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!