कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत तालुका केमिस्ट असोसिएशनच्या निवडणुकीत शिंदे गटाने हॅट्रिक साधत अध्यक्षपदी सुरेश तोरडमल यांची बहुमताने निवड झाली. कर्जत तालुक्याचे लक्ष्य लागलेल्या कर्जत तालुका केमिस्ट असो.च्या त्र्येवार्षिक निवडणूकीत कालिदास शिंदे यांच्या नेतृत्वखालील पॅनलने दणदणीत विजय मिळवला. तालुक्याचे माजी अध्यक्ष आबासाहेब बेद्रे यांच्या कुशल संघटक व प्रामाणिक कामामुळे ही हा विजय सुकर झाला.
कर्जत येथील सुरेश (काका) तोरडमल यांना २३१ मता पैकी १६३ मते मिळून तब्बल ९५ मताने विजय मिळवला, या विजयासाठी रवी काळे, विनोद राउत, सुरेशभाई दोभाडा, विनोद टाक, ईश्वर सोनवणे, प्रदीप कानगुडे, पप्पूशेठ तोरडमल, विनोद यादव, गणेश काळदाते,अशोक शिंदे, आबा पवार, नागेश खेडकर, सुनील भालेराव, नवनीत कोठारी, सुहास बावडकर, विनीत गांधी, निलेश शेवाळे, रमेश गदादे यांनी परिश्रम घेतले, निवडणूक अधिकारी म्हणून निपक्षपणे श्रीराम गायकवाड, गणेश काळदाते, व सुनील भालेराव यांनी अतिशय उत्कृष्ट काम पाहिले. पुढील काळात अतिशय जबाबदारीने व प्रामाणिक काम करू, अशी ग्वाही मावळते अध्यक्ष नूतन अध्यक्ष सुरेशकाका तोरडमल यांनी दिली. आगामी काळात सर्वांना बरोबर घेऊन केमिस्ट हिताचे निर्णय घेण्यात येतील, असे प्रतिपादन सर्व सामाजिक संघटनेचे श्रमप्रेमी व केमिस्ट संघटनेचे नेते कालिदास शिंदे यांनी केले.