Head linesMarathwada

महाविद्यालयात निघालेल्या युवक गणेश भांगे याचे अपघाती निधन

उस्मानाबाद (जिल्हा प्रतिनिधी) – उमरगा तालुक्यातील कलबुर्गी-लातुर मार्गावर नारंगवाडी येथून दुचाकीवरून दोन युवक कॉलेजसाठी उमरग्याकडे निघाले असता लक्ष्मीपाटी जवळ विट घेवून निघालेल्या ट्रकने आचानकपणे न ईडिकेटर हात न दाखवता वळण घेतल्याने झालेल्या अपघात दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला तर एक जखमी झाला आहे. हि घटना शनिवारी (दि०५) सकाळी साडेनऊ च्या सुमारास घडली.

याबाबत प्रत्यक्षदर्शनी दिलेली माहिती अशी,तालुक्यातील नारंगवाडी येथील गणेश संभाजी भांगे (२१) रा दावतपुर (ता उस्मानाबाद,जि.उस्मानाबाद), कृष्णा अभिमन्यू जाधव (२०) रा. नारंगवाडी हे दोघे दुचाकीवरून (क्रमांक एमएच २५ए एक्स ३८१३) लातूर मार्गावरून कॉलेजसाठी उमरग्याकडे निघाले असताना लक्ष्मीपाटीच्या जवळ आले असता समोरुन जाणाऱ्या विट वाहतूक करणाऱ्या ट्रकने (क्रमांक एमएच २५ ए जे ३३०५) आचानक बेसावध पण ईंडिकेटर हात न दाखवताच वळण घेतल्याने दिल्याने जोराची धडक बसुन दुचाकी रस्त्याच्या खड्डय़ात जावून पडून झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक जन गंभीर जखमी झाल्याची माहिती जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज या रुग्णवाहिकेस मिळाल्यानंतर दोघांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमी गणेश भांगे यांची डॉक्टर यांनी तपासणी करून मयत झाल्याची माहिती दिली.कृष्णा जाधव यांच्यावर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान या महिन्यात पाच दिवसात झालेल्या दोन अपघातात एकाचा मृत्यू व चार जण जखमी झाल्याचे माहिती रुग्णवाहिका चालक शेषेराव लवटे यांनी दिली.याअपघातात नाईचाकुर प्राथमिक आरोग्य केंद्र येथील आरोग्य सहाय्यक संभाजी भांगे यांचा मुलगा गणेश याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.शहरात उपजिल्हा रुग्णालयात मयत गणेश भांगे यांचे शवविच्छेदन करून सायंकाळी पाचच्या सुमारास उस्मानाबाद तालुका येथील दावतपुर या मुळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान पोलीसांनी अपघातस्थळी भेट देवून ट्रक व दुचाकी पंचनामा करून वाहने ठाण्यात जमा केली असून याबाबत अद्याप पोलीसांत गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!