कर्जत (प्रतिनिधी) – कर्जत शहर व्यापारी असोसिएशनची पुनर्गठीत नूतन कार्यकारिणीची पहिली मिटिंग आज, दि.८ नोव्हेंबर रोजी नूतन अध्यक्ष बिभिषण खोसे पाटील यांच्या अध्यक्षेतेखाली लकी हॉटेल येथे पार पडली. धर्मादाय आयुक्त कार्यालयाने १९ ऑक्टोबर रोजी नूतन कार्यकारणीची नोंदणी करण्याचे पत्र कर्जत शहर व्यापारी असोसिएशनला दिले आहे. उपाध्यक्षपदी महावीर बोरा तर सचिव पदी प्रसाद शहा, खजिनदार पदी संतोष भंडारी यांची निवड करण्यात आली.
कार्यकारिणीमध्ये विविध क्षेत्रातील व्यापारी सदस्यांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये सदस्य म्हणून गणेश जेवरे, विशाल छाजेड, किशोर बोथरा, गणेश तोरडमल पाटील, संदीप गदादे, स्नेहल देसाई, सुरेश नहार, योगेश राजेजाधव, अनिल भोज यांची निवड करण्यात आली. कार्यकारीणीच्या सल्लागारपदी माजी अध्यक्ष अर्जुन भोज, अनिल जेवरे, संजय काकडे, अतुल कुलथे, श्रीकांत तोरडमल असणार आहेत. कर्जत शहरातील व्यापारी बांधवाची मातृसंस्था म्हणून कर्जत शहर व्यापारी अमोसिएनची ओळख आहे.
शहरातील अन्य प्रमुख क्षेत्रातील सराफ, मेडिकल, आटोमोबाईल, फर्टीलायजर्स, केशकर्तनालय व उपनगरातील व्यापारी बांधवांच्या वतीने प्रतिनिधी कार्यकारिणीमध्ये समाविष्ट करणार असल्याचे नूतन पदाधिकार्यांनी घोषित केले. शहरातील व्यापारी बांधवांना सभासद म्हणून नाममात्र शुल्क आकारून सभासदत्व दिले जाणार आहे. कोरोनाच्या संकटानंतर आगामी काळामध्ये व्यापारी बांधवासाठी विविध विषयावर काम करण्याचे या मिटिंगमध्ये ठरविण्यात आले आहे. यावेळी विमा, कर्ज, ई टॅक्स, मार्गदर्शन, ट्रान्स्पोर्ट, हमाली, काटामापे पासिंग, आदी प्रश्नाबाबत सदस्यांनी आपली मते मांडली व त्यावर तोडगा काढण्याचे ठरविण्यात आले. महिन्यातून एकदा कार्यकारणीची मिटिंग घेणार असून, व्यापारी बांधवांच्या समस्या सोडवण्याचा मानस नूतन पदाधिकार्यांनी यावेळी व्यक्त केला आहे, सर्व व्यापारी मित्रांनी सभासदत्व घेऊन असोसिएशनला सहकार्य करावे, असे आवाहन नूतन अध्यक्ष सचिव व कार्यकारणीने केले आहे.