सोयाबीनवरील निर्बंध उठविल्याने शेतक-यांना दिलासा; आ. संजय गायकवाड यांनी केले केंद्राच्या निर्णयाचे स्वागत!
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – सोयाबीनवरील निर्बंध शासनाने नुकतेच उठविले आहे. त्यामुळे शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला असून, येत्या काळात सोयाबीनला चांगलाच भाव मिळणार असल्याचे चित्र आहे. केंद्र शासनाच्या या निर्णयाचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी जोरदार स्वागत करीत यामुळे शेतक-यांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
परतीच्या पावसामुळे जिल्ह्यात तब्बल 41 हजार हेक्टर पेक्ष जास्त सोयाबीन व कापूस खराब झाले. शेतक-यांच्या तोंडात आलेला घास ऐन दिवाळीच्या दिवसात निसर्गाने हिसकावून घेतल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. जिल्हयात परतीच्या पावसाने सोयाबीन व कापसाचे प्रचंड नुकसान केले. परतीच्या पावसाने नकद पीक समजल्या जाणा-या सोयाबीनचा दर्जा या पावसा मुळे खालावू शकतो, जो माल शेतक-याच्या पदरात पडणार आहे त्याला काही चांगला भाव मिळणार नाही ही बाब शेतक-यांना माहित असल्याने शेतकरी वर्ग हवाल दिल झाला होता. दुसरीकडे तेलबिया व सोयाबीन वर शासनाने सातत्याने निर्बंध टाकल्याने सोयाबीनची मागणी घटली होती. यामुळे शेतक-यांना कमी भावात सोयाबीन विकावे लागत होते. शासनाच्यावतीने या निर्बधाला अनेक वेळा मुदत वाढ देण्यात आली होती. शेवटची मुदत वाढ डिसेबंर पर्यत देण्यात आली होती.
शेतक-यांना कुठे तरी न्याय मिळावा, ही सदभावना ठेवून आ. संजय गायकवाड यांनी शासन व केंद्र शासनाकडे सातत्याने मागणी लावून धरली होती. त्याअनुशंगाने शेतक-यांना दिलासा देण्यासाठी केंद्र शासनाने तेल बीया व सोयाबीन वरील निर्बंध उठविले. त्यामुळे व्यापारी आता खरेदी कडे वळतील मोठया प्रमाणात सोयाबीनची खरेदी केली जाईल. मागणी वाढल्याने सोयाबीनचे भाव चांगलेच मिळणार असल्याने शेतक-यांना मोठया प्रमाणात दिलासा मिळणार आहे. त्यामुळे आमदार संजय गायकवाड यांनी सदर केंद्र शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
शेतक-यांच्या प्रश्नावर उठसूठ आंदोलन करणारे शेतक-यांची दिशाभूल करीत आहे. केंद्र व राज्य शासन हे शेतक-यांच्या पाठीशी आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संवेदनशिल आहेत शेतक-यांच्या कष्टाची त्यांना जाण आहे. त्यामुळे ते सातत्याने शेतक-यांच्या पाठीशी आहेत व आपण देखील सातत्याने त्यांच्या पाठीशी आहोत.
– आ. संजय गायकवाड, बुलढाणा