आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील आळंदी नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक दोन मधील विविध सिमेंटीकरणांच्या सुमारे १ कोटी ५२ लाख रुपये खर्चाच्या रस्ते विकासास सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती शिवसेना गटनेते स्थानिक नगरसेवक तुषार घुंडरे पाटील यांनी दिली. खेडचे आमदार दिलीपशेठ मोहिते पाटील यांचे विशेष प्रयत्नातून आळंदीतील विविध विकास कामास सुमारे २ कोटी ८५ लाख रुयांचा निधी राज्य शासनाच्या विशेष अनुदान योजनेतून उपलब्द्ध करून देण्यात आला असून यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करीत कामास गती दिल्याचे घुंडरे पाटील यांनी सांगितले. या प्रसंगी शेतकरी बचाव आंदोलन अध्यक्ष गजानन गाडेकर, नाना क्षीरसागर, नाना तौर, संतोष जयस्वाल आदी उपस्थित होते.
यातील सुमारे १ कोटी ५२ लाख रुपयांची कामे करण्यास निधी मंजू आणि प्राप्त झाला असून यातील विविध विकास कामे सुरु करण्यात आली आहे. तत्पूर्वी २० लक्ष रुपयांचे रस्ता सिमेंटीकरणाचे काम स्व : निधीतून पूर्ण करण्यात आले असल्याचे घुंडरे पाटील यांनी सांगितले. उर्वरित कामांतील रस्त्यांची क्षीरसागर निवास ते कमलेश कोद्रे निवास ५५ लाख रुपये निधी, माउली पार्क येथील माजी नगरसेविका उषा नरके निवास ते तानाजी जगताप निवास या कामासाठी ६२ लाख रुपये निधीचे कामास मंजुरी तसेच कामाची वर्क ऑर्डर देण्यात आली असून ते ही काम या प्रभागातील होणार आहे. याशिवाय माउली जाधव निवास ते माजी नगरसेविका शारदा गोरे निवास या कामासाठी १५ लाख रुपयांचा निधीसह काम मंजूर असुन्यासाठी देखील वर्क ऑर्डर देण्यात आली आहे. तिन्ही कामासाठी आपण वेळोवेळी पाठपुरावा केला असल्याचे त्यांनी सांगितले. प्रभागातील विविध कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे या महिना भरात पूर्ण होती असे त्यांनी सांगितले. याशिवाय प्रभागात नव्याने झालेल्या रस्त्यांचे कडेला विद्युत पोल उभारून प्रकाश व्यवस्था करण्यास पाठपुरावा सुरु असल्याचे घुंडरे पाटील यांनी सांगितले. पिण्याचे पाणी, ड्रेनेज व्यवस्था आता रस्ते विकास करण्यात आला असल्याने प्रभागात सर्व समावेशक विकास कामे करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.