BULDHANAHead linesVidharbha

दिवाळीच्या दिवशी आ. संजुभाऊंनी खाल्ली कलेक्टर कचेरीपुढे चटणी-भाकर!

राजेंद्र काळे

बुलढाणा – दिवाळीच्या दिवशी परिवारासह आ.संजय गायकवाड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे चटणी-भाकर खाऊन कष्टकरी व अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांप्रती संवेदना व्यक्त केल्या. तर याच दिवशी हतेडी येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची त्यांनी पाहणी करुन नुकसानग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना दिवाळी निमित्ताने जीवनावश्यक वस्तू, कपडे व फराळ देवून त्यांच्या आनंदात सहभाग नोंदवला. त्यानंतर त्यांनी पळसखेड सपकाळ येथील सेवासंकल्प प्रतिष्ठाणवर जावून मनोरुग्णांसोबत दिवाळीचे काही क्षण घालवले. यावेळी त्यांच्या देवा दांडगे या कार्यकत्र्याने नंदकुमार पालवे व सौ.आरती पालवे यांच्याकडे उपसरपंच पदाचे २ महिन्यांचे मानधन सुपूर्द केले.

दिवाळीत शेतकऱ्याच्या तोंडी आलेला घास निसर्गाने हिरावला त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात साजरी होत असल्याने शेतकऱ्याचे दुःख आपले दुःख समजून त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी आ.संजय गायकवाड यांनी देखील यंदाची दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला. दिवाळीच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे चटणी अन् भाकर खाऊन सोमवार २४ ऑक्टोबर रोजी या संवेदना व्यक्त केल्या. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा परिवार तसेच शेकडो शेतकरी सुद्धा सहभागी झाले होते. हे आंदोलन सोमवारी करण्यात आले.

परतीच्या पावसाने जिल्ह्यात सुमारे ३१ हजार हेक्टरवर नुकसान केले आहे. शेतकऱ्यांच्या तोंडात आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. शेतकऱ्यांच्या शेतात उभे असलेली सोयाबीन कापूस हे सडून गेले त्यामुळे दिवाळीचे स्वप्न पाहणाऱ्या शेतकऱ्यावर मोठे संकट कोसळले तर दुसरीकडे अद्यापही पंचनामे पूर्ण न झाल्याने शेतकरी त्रस्त आहेत पंचनामे पूर्ण नसल्याने सरकार त्यांना मदत जाहीर करण्यात अडचण येत आहे. शेतकऱ्यांची ही दयनीय अवस्था पाहता आपण देखील यंदाची दिवाळी साजरी करणार नाही, दिवा जळणार नाही, कार्यालय व घरावर लाइटिंग करणार नसल्याचे आ.संजय गायकवाड यांनी सांगत गोडधोड खाणार नसल्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आ.गायकवाड व परिवाराने जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी चटणी भाकर खाऊन शेतकऱ्याप्रतीच्या संवेदना व्यक्त केल्या. यावेळी त्यांनी शासनाला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत उपलब्ध करावी अशी मागणी देखील केली.

यावेळी आंदोलनात माजी नगराध्यक्षा सौं. पुजाताई संजय गायकवाड, युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड, शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, शिवसेना नेते संदीप गायकवाड, शिवसेना उपजिल्हाप्रमुख भोजराज पाटील, युवासेना उपजिल्हा प्रमुख प्रवीण निमकर्डे, शिवसेना तालुका प्रमुख धनंजय बारोटे, शिवसेना शहर प्रमुख गजेंद्र दांदडे, मोताळा शहर प्रमुख सुरेश खर्चे, शिवसेना महिला आघाडी वैशालीताई ठाकरे यांच्यासह बुलडाणा तसेच मोताळा येथील सर्व नगरसेवक, शिवसेना, युवासेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!