चिखली (तालुका प्रतिनिधी) – गटविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विस्तार अधिकारी वैराळ यांच्या मार्गदर्शनाखाली मेरा खुर्द येथील विश्रामगृह येथे ‘आमचं गावं आमचा विकास’ उपक्रमाअंतर्गत कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत ग्रामसेवक पर्हाड आणि सरपंच घोडे यांनी मोलाचे सहकार्य केले.
शासकीय योजनांचा लाभ आणि त्यावर मिळणारे अनुदान याबाबत सखोल माहिती अधिकारी, कर्मचारी वर्गाना व्हावी, या उद्देशाने चिखली गटविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी तथा विस्तार अधिकारी व्हीं. आर. वैराळ यांनी मेरा खुर्द येथील विश्रामगृहात राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान आमचं गावं आमचा विकास उपक्रमाअंतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेत ग्रामपंचायत विकास आरखडा तयार करणे, जि.प.शाळा, अंगणवाडी शाळा, आरोग्य, पाणी टंचाई , आदी विकास कामाबाबतीत उपस्थित कर्मचार्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ग्रामसेवक व्ही एस पर्हाड, पर्यवेक्षिका एम बी केवट, विनायक वायाळ, सचिव , सरपंच सौ गोदावरी नंदकिशोर घोडे, ग्रा. प. सदस्य गुलाबनबी गुलाब जिलानी, सुधाकर शिंदे, मुख्याध्यापक परिहार, उर्दु शाळेचे मुख्याध्यापक पटेल सर, उर्दु हायस्कूलचे प्राचार्य जुबेर सर, तलाठी वानखेडे, किंगरे, कृषी सहाय्यक सोनाळकर, डुकरे, शिंदे मॅडम, अंगणवाडी सेविका कल्पना गवई, उषा उदार, नर्बदा मस्के, संतोषी मुजमुले, सुनीता ठाकुर, भागिरीथी काळे, सपना गवई, सुनीता भोपळे, आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक ग्रामसेवक पर्हाड यांनी केले तर आभार सरपंचपती नंदकिशोर घोडेयांनी मानले.