Aalandi

पाेलिस मित्र युवा महासंघाच्या प्रदेश महिला आघाडी अध्यक्षपदी ज्योती पाटील

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील पोलिस मित्र युवा महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडी अध्यक्षपदी ज्योती पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या नियुक्तीचे पत्र संस्थापक अध्यक्ष नितीन जैस्वाल, उपाध्यक्ष नम्रता जैस्वाल, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रविण बोबडे यांचे माध्यमातून शिफारसीने करण्यात आली आहे. या निवडीचे परिसरातून स्वागत करण्यात आले. महाराष्ट्र राज्यात पोलीस मित्रां बरोबर काम करत आहे. पोलीस प्रशासनास ज्यावेळी पोलीस मित्र युवा महासंघाची मदत लागेल त्यावेळी पोलीस मित्र युवा महासंघ मदत करीत आहे.

यावेळी प्रा. नितिन जैस्वाल यांनी पोलीस मित्र युवा महासंघाचे कार्या विषयी मार्गदर्शन केले. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रविण बोबडे यांनी मार्गदर्शन करीत शुभेच्छा दिल्या. नवनियुक्त महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्षा ज्योती पाटील म्हणाल्या, राज्यात महिलांचे संघटन करून पोलीस मित्र युवा महासंघाचे कार्य अधिकाधिक वाढविले जाईल. यासाठी सर्वाना बरोबर घेऊन कामकाज केले जाईल. यावेळी पुणे जिल्ह्यातील पोलीस मित्र उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!