आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : महिलांच्या इच्छा आकांक्षा खूप असतात. त्यांना वाट मोकळी करून देण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ म्हंणून नारी शक्ती ग्रुप कार्यरत आहे. या माध्यमातून सामाजिक बांधिलकीतून समाजसेवा आणि महिलांना रोजगार मिळवून देण्याचे कार्य दृष्टी सेवाभावी संस्था करीत आहे. यासाठी इतर वस्तू देण्यापेक्षा एक मूठ धान्य देण्याचे आवाहन दृष्टी सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा दिपाली सुरवसे यांनी केले.
दृष्टी सेवाभावी संस्था संचलित नारी शक्ती ग्रुपचे वतीने आयोजित नवदुर्गा २०२२ पुरस्कार वितरण सोहळ्यात मार्गदर्शन करताना दृष्टी सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा दिपाली सुरवसे बोलत होत्या. पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी संयोजक दिपाली सुरवसे, पोलीस मित्र युवा महासंघाचे प्रदेश अध्यक्ष प्रविण बोबडे, माजी उपनगराध्यक्ष आदित्य घुंडरे,माजी नगरसेवक दिनेश घुले, सामाजिक कार्यकर्ते अतुल काळजे, कामिनी पांचालसुनीता लांडे, अलका जोगदंड, कविता नांगरे, अलका जोगदंड, कल्पना जगताप, सांउड सिस्टीमचे विनोद दिवार, हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा मनीषा पवळे, ज्योती पाटील,शशिकांराचे जाधव, सुदीप गरुड, आकाश शेळके, वृषाली मतकर, गितांजली भस्मे, तनूजा कांबळे, सुरज कांबळे यांचेसह विविध क्षेत्रात कार्यरत सेवाभावी संस्थाचे पदाधिकारी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दृष्टी सेवाभावी संस्थेचे अंध मुलींचे वसतिगृह आहे. यावेळी ऐक मुठ धान्य देण्याचे आवाहन दिपाली सुरवसे यांनी केले. येथील संकलित धान्य गरजूंसाठी उपयुक्त ठरत आहे. विविध सेवाभावी संस्था, व्यक्ती यांनी एकमुठ धान्य देऊन या सामाजिक बांधिलकीत सर्वानी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. च्या उपक्रमास हातभार लावावा असे त्यांनी सांगितले. या उपक्रमात दृष्टी सेवाभावी संस्थेचे वतीने १९ विविध क्षेत्रातील सेवाभावी संस्था, महिला प्रतिनिधी, महिला पोलीस कर्मचारी, सामाजिक कार्यकर्त्या यांना नारी शक्ती ग्रुप च्या वतीने नवदुर्गा २०२२ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यासाठी संयोजक दिपाली सुरवसे, सुनीता लांडे, अलका जोगदंड, कविता नांगरे यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थित मान्यवरांचे हस्ते विविध क्षेत्रातील क्रियाशील सेवारत महिलांनी उत्साहात पुरस्कार स्वीकारले.यात राजगुरूनगर येथील हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशन अध्यक्षा ॲड. मनीषा पवळे टाकळकर यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. गेल्या ३ वर्षां पासून नारी शक्ती पुरस्कार वितरित केले जात आहेत. यावेळी पोलीस मित्र युवा महासंघाचे प्रदेश अध्यक्ष प्रविण बोबडे, कामिनी पांचाल आदींनी मनोगते व्यक्त केली. प्रास्ताविक अलका जोगदंड यांनी केले. कल्पना जगताप यांनी सूत्रसंचालन केले. विनोद दिवार सांउड सिस्टीम सेवा विशेष सहकार्य केले.