BULDHANAChikhaliCrimeHead lines

कोर्टात साक्षीला जाऊ नये म्हणून आरोपीकडून साक्षीदारावर जीवघेणा हल्ला

– साक्षीदार गंभीर जखमी, मृत्यूशी झुंज सुरू!

चिखली (विशेष प्रतिनिधी) – कोर्टात साक्षीला जाऊ नये म्हणून कुख्यात गुंडाने साक्षीदारावर प्राणघातक हल्ला केल्याची भयानक घटना मौजे मंडपगाव (ता. देऊळगावराजा) येथे घडली आहे. याप्रकरणी अंढेरा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गंभीर जखमीवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. ‘जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दाखल ३०७ कलमाच्या गुन्ह्याची केस मिटव नाही तर तुला आणि तुझ्या भावाला ठार मारतो’, असे म्हणत कुख्यात गुंड रफिक अजमत पठाण, समीर अजमत पठाण व अजमत पठाण, सय्यद जाकेर यांनी फिर्यादी व साक्षीदार तरबेज पठाण, सादिक पठाण यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. यामध्ये सादिक पठाण याच्या डोक्याला तर तरबेज याच्या कमरेवर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याने, हे दोघेही गंभीर जखमी आहेत. आरोपींना अटक करण्यासाठी अंढेरा पोलिसांनी रात्री उशिरा प्रयत्न सुरु केले होते.

सविस्तर असे, की तरबेज पठाण, सादिक पठाण यांच्यावर २०१४ मध्ये धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी आरोपी रफिक अजमत पठाण यावर भारतीय दंडसंहिता अपराध क्र.४८/२०१४, हाफमर्डर,३०७, ५०६, ५०४, १४३, १४६, १४८, १४९ गुन्हे दाखल आहे. सदर केस ही आपसात मिटून घे अन्यथा आम्ही तुला जीवे मारू, अशा धमक्या रफिक अजमत पठाण, समीर अजमत पठाण, अजमत महेबूब पठाण हे तिघे बापलेक फिर्यादीला देत होते. तसेच, सद्या गंभीर जखमी झालेले फिर्यादी तरबेज पठाण यांनाही वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. सद्या सदर केसही न्यायालयात सुनावणीला असून, तरबेज हबीब पठाण यांना बुलढाणा न्यायालयाने साक्ष देण्यासाठी १५ ऑक्टोबर २०२२ रोजी साक्षसमन्य काढलेले आहे. परंतु, साक्षीदार तरबेज पठाण, सादिक पठाण यांना साक्ष देण्यासाठी न्यायालयापर्यंत पोहोचू देणार नाही, या इरेला पेटलेल्या व त्या कुहेतूने ४ ऑक्टोबरच्या रात्री ११ ते पावणेबारा वाजेच्या दरम्यान हाप मर्डर केसमधील आरोपी रफिक अजमत पठाण व त्याचा भाऊ आरोपी समीर अजमत पठाण, अजमत पठाण, सय्यद जाकेर सय्यद सैदान यांनी तरबेज पठाण व त्यांचा भाऊ सादिक पठाण यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या दोघांवर धारदार शस्त्राने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने प्राणघातक वार केले. यामध्ये सादिक पठाण यांना गंभीर दुखावत झाली असून, त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरु आहेत.


या घटनेप्रकरणी अंढेरा पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने अंढेराचे ठाणेदार गणेश हिवरकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता, साक्षीदारांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणार्‍या मारेकर्‍यांवर भादविंच्या ३२४ व ३०७ कलमान्वये गुन्हे दाखल केले गेले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली आहे. हाप मर्डरसारख्या गुन्ह्यातील आरोपी जामिनावर बाहेर राहिल्यास साक्षीदारांच्या जीवितास धोका असल्याने न्यायालयाने या आरोपींचा जामीन तातडीने रद्द करून, त्यांना कारागृहात ठेवण्याची गरज यानिमित्ताने अधोरेखीत झालेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!