वर्धा (विशेष प्रतिनिधी) – दुर्गादेवीची विसर्जन मिरवणूक निघाली असताना मिरवणुकीत चाकू घेऊन शिरणार्या तसेच मिरवणुकीत गोंधळ करणार्या दोघांना पोलिसांनी फटक्य़ांचा प्रसाद देत पळता भुई थोडी केली. त्यांना मिरवणुकीत चाकू घेऊन वावरणे चांगलेच महाग पडले. पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करीत त्यांच्याजवळून चाकू जप्त केला.
दुर्गादेवीच्या विसर्जनानिमित्त शहरातील विविध रस्त्यांवर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. निर्मल बेकरी चौोकातून विसर्जन मिरवणूक जात असताना या मिरवणुकीत स्टेशनपैâलात राहणारा सोहेल उर्फ आफताब उर्फ मोंढा नावाचा २३ वर्षीय युवक हातात चाकू घेऊन शिरला. तो हातात चाकू घेऊनच नाचू लागला. पोलिसांना हा प्रकार दिसताच त्यांनी सोहेल याला पकड़ण्याचा प्रयत्न केला. पण तो पळून जाऊ लागला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. यात तो सिमेंटरस्त्यावर पडला. त्यात त्याच्या हाताला तसेच पाठीला मार लागला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याच्याजवळून चाकू जप्त केला.
दुसर्या घटनेत वंजारी चौकातून दुर्गादेवीची विसर्जन मिरवणूक जात असताना गजानन नगरात राहणारा आकाश देवराव तुपट हा हातात चाकू घेऊन लोकांत नाचाय़ला लागला होता. पोलिसांनी त्याला मनाई करताच तो पोलिसांसोबतच हुज्जत घालू लागला. याची माहिती रामनगर पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांची मदत आली. त्यांनी आकाश तुपट याचा शोध घेत त्याला अटक केली. रामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी कायमच सुरू असते. पोलिसांंनी वचक गमावल्याने असल्या प्रकारात वाढ झाली आहे.