लातूर (जिल्हा प्रतिनिधी) – उदगीर विधानसभा मतदारसंघाचा आमदार व मंत्री म्हणून काम करत असताना मतदारसंघावर कुटुंबाप्रमाणे प्रेम करून मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी गेली तीन वर्षे झालं काम करत आहे, प्रत्येक समाजाला व समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी मी सदैव तत्पर आहे. आपल्या पुरस्काराने मला काम करण्याची नवी ऊर्जा मिळाली, असे मत माजी गृहराज्यमंत्री तथा आमदार संजय बनसोडे यांनी व्यक्त केले. ते उदगीर येथील अॅड. बस्वराज मुळे मित्र मंडळाच्यावतीने त्यांचा विकासरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी ते सत्काराला उत्तर देत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजेश्वर निटुरे, वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापूरे, उदगीर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष कल्याण पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती रामराव बिरादार आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार संजय बनसोडे यांनी आपल्या पुरस्काराने मला नवी ऊर्जा मिळाली असून या पुढील काळात एक दिवस न थांबता, न थकता मी सतत काम करत राहीन. आपण सर्वांनी मला आमदार होण्याची संधी दिली. त्या संधीचे सोने मी पुढील काळात करून आपल्या विश्वासाला तडा जावु देणार नाही, असे सांगून आजपर्यंत उदगीर – जळकोट मतदार संघात कोट्यावधीचा निधी मी मंत्री असताना आणला असुन मंजूर असलेल्या व पूर्ण होत असलेल्या विकास कामांबाबत माहिती दिली. मी मंत्री झाल्यानंतर जेवढा आनंद मला झाला त्यानंतर आज आपला पुरस्कार स्वीकारताना झाला असल्याचे भावुक उद्गारही आ. बनसोडे यांनी काढले.
यावेळी ज्येष्ठ नागरीक बाबुराव समगे यांना वाढदिवसानिमित्त आमदार बनसोडे यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. कार्यक्रमास डॉ.रामप्रसाद लखोटिया, अध्यक्ष उदयगिरी लॉयन्स धर्मादाय नेत्ररूग्नालय उदगीर, सुभाष धनुरे, महादेव नौबदे, बालाजी पाटील नेत्र गावकर, ज्ञानेश्वर बिरादार, गंगाधर स्वामी, अॅड. आदेप्पा वलांडीकर, उमाकांत चणगे, विलास बोके, श्रीधर बिरादार, बबलू जाधव, सतीश बिरादार, भीमाशंकर मुद्दा, अनिल डोईजडे, रवी साकोळकर, अश्विन हावा, जय स्वामी, शिवकुमार पांडे, महेश झुंगास्वामी, राजू चौधरी, प्रवीण उप्परबावडे, फैयाज डांगे, नंदकुमार ढोले, राजु हुडगे, बसवराज ढोले, गुंडप्पा समगे, अनिल मुळे, शिवराज मुळे, शांतवीर मुळे, नंदकुमार कारभारी, वैजनाथ उप्परबावडे, राजकुमार हरकरे, धुळप्पा सोलापूरे, मनोहर कानमंदे, विश्वनाथ बिरादार, बसवराज कानमंदे, चंद्रकांत चणगे आदीसह अॅड बस्वराज मुळे मित्रमंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रा.मल्लेश झुंगास्वामी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड.महेश मळगे यांनी केले. सूत्रसंचालन नंदकुमार पटणे यांनी तर आभार अॅड.राजकुमार उस्तुरे यांनी मानले.