मंत्रालयीन विशेष कार्य अधिकाऱ्याने घेतली स्वेच्छानिवृत्ती; सुनील शेळके : जमिनीवरचा माणूस जमिनीवरच!
राजेंद्र काळे
बुलढाणा : तसे कायम जमिनीवरच असणारे, एक समाजशील अधिकारी म्हणजे सुनिल शेळके. नायब तहसीलदारापासून व्हाया तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, अनेक विभागांचे अधिकारी ते मंत्रालयापर्यंत विशेष कार्य अधिकारी अर्थात ओएसडी. पदापर्यंत पोहचलेले असतांना व त्यांच्या सेवेची ११ वर्ष बाकी असतांना, स्वेच्छा सेवानिवृत्ती घेवून ते जमिनीवर उतरले, अर्थात शासकीय सेवेत काम करतांना महसूल विभागात जमीन प्रकरणासंबंधी वर्षानुवर्ष चालणारी क्लीष्ट प्रक्रिया बघितल्यानंतर.. ती सहजसोपी ऑनलाईन पध्दतीने तात्काळ करुन देण्यासंदर्भात त्यांनी मुलीच्याच नावे ‘अभिता लॅण्ड सोल्युशन्स प्रा.लि.’ ही कंपनी काढली असून, बिल्डरपासून ते गावखेड्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांपर्यंत त्या माध्यमातून काम करणाऱ्या मानस त्यांनी व्यक्त केला.
शिरपूर या छोट्याशा खेड्यातून सुनिल शेळके स्पर्धा परिक्षांच्या माध्यमातून १९९७ला मंत्रालयात सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून रुजू झालेत, २००१ मध्ये मलकापूर व नंतर मोताळ्याला नायब तहसिलदार म्हणून आले. पुढे मोर्शी, सिंदखेडराजा व अकोला तहसिलदार म्हणून त्यांनी सेवा दिली. उपजिल्हाधिकारी बनल्यावर त्यांनी आधी वाशिमला जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून व नंतर बुलडाण्याला जिल्हा पुनर्वसन अधिकारी म्हणून काम केले. शासकीय सेवेत असतांना मराठा सेवा संघातही सामाजिक जबाबदारी पार पाडली. पुढे ना. अब्दुल सत्तार यांचे ओएसडी अर्थात विशेष कार्य अधिकारी म्हणून काम सुरु केले. या पदावर असतांनाच, व एक शासकीय अधिकारी कसा असावा? याचे आदर्श उदाहरण म्हणजे सुनिल शेळके बनले असतांना, त्यांनी सर्वांना धक्का देत स्वेच्छा निवृत्तीसाठी अर्ज टाकला, व तो १९ जुलै रोजी मंजूरही झाला.
वयाच्या ४७व्या वर्षी सेवेची ११ वर्ष बाकी असतांना, व विशेष म्हणजे त्यात प्रमोशन ड्यू असतांना.. सुनिल शेळके यांनी घेतलेली स्वेच्छानिवृत्ती अनेकांना धक्का देणारीच होती. पण ‘सिस्टीम’मध्ये काम करतांना, ज्या वेगात कामे करावी.. अशी अपेक्षा असते, ती होत नसल्याने.. त्याच क्षेत्रात एक पर्यायी कंपनी त्यांनी काढली असून, ‘अभिता लॅण्ड सोल्युशन्स प्रा.लि.’ या माध्यमातून त्यांनी सेवेचे एक नवीन ऑनलाईन माध्यम सुरु केले आहे.
#ONLINE CONSULTATION
@ABHITA LAND SOLUTIONS
अभिताच्या वतीने ONLINE CONSULTATION सेवा सुरू
ग्राहकांना जमीन व मालमत्ता क्षेत्रातील अत्याधुनिक सेवा जलद गतीने देण्यासाठी ABHITA LAND SOLUTIONS PVT LTD सतत कटिबद्ध आहे. कंपनीने जमीन व मालमत्ता क्षेत्रातील समस्या, शंका यांचे निरसन करण्यासाठी ONLINE सेवा राज्यभर सुरू केली आहे. कोणत्याही समस्ये संदर्भात कायदेशीर अभिप्राय ( LEGAL OPINION ) खाली दिलेल्या LINK वरून मिळवू शकता. केवळ 48 तासांमध्ये आपल्याला सदर अभिप्राय प्राप्त होणार आहे.
( CUSTOMER CARE – 83560 40714 )
Legal opinion related to land and property matters available online through the link mentioned below
Legal opinion will be received within 48 hours.
VISIT US – www.abhitalandsolutions.com
(श्री राजेंद्र काळे हे विदर्भातील आघाडीचे दैनिक देशाेन्नतीचे बुलडाणा जिल्हा प्रतिनिधी तथा ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चे विदर्भ व नाशिक विभाग सल्लागार संपादक आहेत. संपर्क 9822593923)