कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत नगरपंचायत हद्दीत बेकायदा पैसे वसुली करून भ्रष्टाचारी मार्गाने मनमानी कारभार करणारे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता एस एस सिंग यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असे निवेदन शहरातील गदादे नगर येथील नागरिकांनी कार्यकारी अभियंता वितरण यांना दिले आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मध्ये सहाय्यक अभियंता म्हणून एस एस सिंग हे केली अनेक वर्षापासून कर्जत येथे कार्यरत आहेत, सदर अधिकारी कर्जत शहरात नव्याने कनेक्शन देण्याऐवजी मी आहे तुम्हास कनेक्शनची काय गरज मला महिन्याला पाचशे रुपये देत जा असे म्हणत वीज वितरण कंपनीलाच अंधारात ठेवत आपले खिसे भरण्याचा गोरख धंदा सुरू केलेला असल्याचा गंभीर आरोप शहरातील गदादे नगर येथील सोमनाथ गराडे, सोपान गदादे, नानासाहेब गदादे, रामदास गदादे, माणिक गदादे, राजेंद्र गदादे, संदीप गदादे, अशोक गदादे आदिसह अनेकांनी केला आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता के एन जमदाडे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही काहीजण वीज वितरण कंपनीचे नियमित ग्राहक असून, दरमहा वेळोवेळी न चुकता वीज बिल भरीत आहोत. तसेच लाईट गेल्यावर सिंग यांना फोन करून लाईट चालू करण्याची मागणी केली असता, नियमित वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांना देखील ते नियमित व सुरळीत लाईट चालू ठेवण्यासाठी दरमहा पाचशे रुपये प्रमाणे मागणी करतात. सदर रक्कम देऊ न शकल्याने त्यांनी आमच्यावर खोटी कारवाई करण्याची धमकी दिली असून, आज १ सप्टेंबर रोजी सकाळी १० वा सिंग हे गजानन गदादे नगर येथे आले व कोणतीही पूर्व सूचना न देता बेकायदेशीररीत्या आमचे वीज कनेक्शन कट केले. त्यांनी आम्हास खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली असून, अरेरावीची भाषा वापरत दमदाटी व शिवीगाळ करून गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला असल्याची तक्रार या अर्जात करण्यात आली आहे, सदर सदर कर्मचाऱ्याने मनमानी पद्धतीने वागत गैरमार्गाने मोठी रक्कम जमा केली असून, वीज गेल्यावर विचारणा केली असता लाईट काय तुमच्या बापाची आहे काय आमच्या मनाप्रमाणे आम्हास वाटेल त्यावेळेस चालू करू, तुम्हास लगेच पाहिजे असेल तर मला एक हजार रुपये आणून द्या, तरच तुमची लाईट चालू करतो, अशी ते पैशाची मागणी करत आहेत, तरी सहा अभियंता सिंग यांचे वर कारवाई करावी, असे निवेदन गदादे नगर मधील नागरिकांसह कर्जत नगर पंचायतचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक नामदेव राऊत यांनी कार्यकारी अभियंता के ऐन जमदाडे यांना दिले आहे.
कर्जत तालुक्यात गेली अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या सिंग यांचे सर्वसामान्यांना बोलणे अत्यंत खालच्या पातळीचे असते, अत्यंत गुर्मी असलेल्या या व्यक्तीचे अनेकांशी वाद होतात, वीज वितरणच्या वसुली प्रसंगी त्याचा दुजाभाव सातत्याने पुढे येतो. मात्र याविरुद्ध कोणीही तक्रार करत नसल्याने त्याच्या वागणुकीस खतपानीच मिळत होते. याविरुद्ध गदादे नगर मधील नागरिकांनी तक्रार करून जे पाऊल उचलले आहे ते नक्कीच कौतुकास्पद असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.