– महागाई कमी न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा दिला इशारा
चिखली (तालुका प्रतिनिधी) – जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ तात्काळ कमी करा, अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशारा चिखली तालुकाध्यक्ष कृष्णा मिसाळ यांनी तहसीलदारांना निवेदन देत, राज्य सरकारला दिला आहे. महागाईने सर्वसामान्य व गोरगरिबांचे कंबरडे मोडले असून, महागाई रोखण्यात केंद्र व राज्य सरकारला अपयश आले आहे, त्याविरोधात आम्ही रस्त्यांवर उतरून तीव्र आंदोलन करू, असा इशाराही कृष्णा मिसाळ यांनी सरकारला दिला. यावेळी चिखली तहसीलसमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात येऊन सरकारचा निषेध करण्यात आला.
चिखली तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने आज चिखली तहसीलसमोर शासनाच्या चुकीच्या धोरणाविरोधात घोषणा देत, निषेध व्यक्त केला व नंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. गॅस, पेट्रोल-डिझेल व अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या रोजच्या वाढत्या महागाईने सर्वसामान्य माणसाला जगणे अवघड झाले आहे. शासनाने तात्काळ जीवनावश्यक वस्तूचे भाववाढ कमी करावे, अन्यथा येत्या काही दिवसात रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कृष्णा मिसाळ यांनी दिला.
हे निवेदन देतेवेळी राष्ट्रवादीचे प्रदेश प्रतिनिधी शंतनू बोन्द्रे, मनोज दांडगे, प्रमोद पाटील, रवी तोडकर, गजानन वायाळ, शेखर बोन्द्रे, सतीश बाहेकर, संजय खेडेकर, प्रशांत एकडे, शेख युसूफ भाई, भाई प्रशांत डोंगरदिवे, नीळकंठ महाल, शैलेश अंभोरे, सोहम सावळे, शेख अनिस, नीलेश जाटोळ, प्रमोद चिंचोले, किशोर हेलगे, देवानंद पाटील, विकी सौदागर, भिकणराव भुतेकर, अमोल भुतेकर, विठ्ठल भुतेकर, शिवदास भांदर्गे, अक्षय सुरूशे, परमेश्वर मिसाळ, दिलीप शितोळे, बाळू काळे, अंकुश थुट्टे, तुकाराम सापते, नारायण चित्राळे, आनंथा गाडेकर, नंदू अंभोरे, सीताराम जाधव, गोपीनाथ सुरुशे, भागवत सुरुशे, स्वप्नील गवते, वसीम खान, नारायण भाऊ, किरण काकडे, कृष्णा भुतेकर, प्रसाद पाटील आदी राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.