मेरा बु , ता. चिखली (प्रताप माेरे) : राज्य परीक्षा परिषद मार्फत शिक्षण विभागाने घेतलेल्या एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत अमरावती विभागातून मेरा बु. शिवाजी हायस्कलच्या १३ विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावून घवघवीत यश प्राप्त केले . त्यामुळे गावकऱ्यांच्या वतीने ग्रा.प.माजी सरपंच तथा सदस्यांनी २० ऑगस्ट रोजी विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार शिवाजी हायस्कूल मध्ये पार पडला .
राज्य परीक्षा परिषदेने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील इयत्ता आठवीच्या प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना बुद्धिमान सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करण्यात येते. ज्या पालकांचे उत्पन्न दीड लाख रुपयांपेक्षा कमी , सातवीत किमान ५५ टक्के गुण , लेखी परीक्षेतून विद्यार्थ्यांची गुणांच्या आधारे व राज्याने निश्चित केलेल्या मागासवर्गीयांसाठीच्या आरक्षणानुसार विद्यार्थ्यांची निवड होते.आणि पात्र विद्यार्थ्यांना दर वर्षी बारा हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. अशा या केंद्र शासनाच्या एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षेत मेरा बु शिवाजी हायस्कूल मधील आठवीच्या तेरा ( १३) , विद्यार्थ्यांनी शाळेत तासीकेवर शिक्षण देणारे शिक्षक हर्षल पडघान , आणि सतीश कुमार पडघान यांच्या मार्गदर्शनाखाली घवघवीत यश प्राप्त केले आणि शिवाजी संस्था अमरावती विभागातून प्रथम आलेली कु नेहा सुनील वायाळ तर वैष्णवी केशव गायकवाड ,पूर्वा संजय मापारी ,आकांशा विजय मापारी ,कु वैष्णवी राजेंद्र वायाळ, कु अर्पिता पुरुषोत्तम पडघान, अशितोष शिवाजी चेके , कु वैष्णवी विष्णू पडघान, कु गौरी राजेश भरती , ओम सुनील पडघान, कु नंदनी भगवान शेळके, कु कविता ज्ञानेश्वर गायकवाड , शेखआयान शेख सय्यद आशा एकूण १३ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत बाजी मारली अशा या विद्यार्थ्यांचा सत्कार ग्रा.प. माजी सरपंच सुनील पडघान, सदस्य पुरुषोत्तम पडघान, के के पडघान , भारत पडघान , लक्ष्मण पडघान यांनी शिवाजी हायस्कूल मध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात केला होता.
यावेळी मंचकावर शाळा समिती सदस्य विनायकराव पडघान , ग्रामसेवा सो सा अध्यक्ष भास्करराव पडघान ,अनिरुद्ध पडघान , , प्राचार्य शेख , पर्यवेक्षक सोळंकी ,सोळंकी मॅडम , पत्रकार प्रताप मोरे , अंभोरे , मुख्याध्यापक शिक्षक इंगळे, शिक्षक प्रतिनिधी मोहोड सर , दीपक केदार, बुधवत सर , म्हस्के , नागरे मॅडम , पुनकर मॅडम , राठोड , बोडके , पवार , अनिल जाधव , बंगाळे मामा , यांनी प्रतिमेचे पूजन करुण यश प्राप्त केलेल्या प्रत्येक विद्यार्थी व विद्यार्थ्यांनीचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी के पडघान सर यांनी केले तर आभारप्रदर्शन मोहोड सर यांनी मानले .