कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत तालुक्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या कुळधरण ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुधीर काकासाहेब जगताप यांची आज बिनविरोध निवड झाली. निवड होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत फटाके फोडत मोठा जल्लोष केला व सर्वांनी श्री जगदंबा देवीचे दर्शन घेतले.
यावेळी नूतन उपसरपंच सुधीर जगताप यांनी बोलताना म्हणाले, मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कट्टर कार्यकर्ता व आमदार रोहित दादाचा विश्वासू समर्थक आहे. त्यांच्या मुळेच हे पद मला मिळाले असले तरी, मला जगताप गटाकडून कुळधरण ग्रामपंचायत उपसरपंचपदी आज माझी निवड झाली आहे. यापुढे मी कर्जत तालुक्याचे भूषण आमदार रोहितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखालीच काम करणार आहे. कुळधरण ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाल्यापासून रोहित दादा माझ्या सतत संपर्कात होते. जनतेची अनेक कामे दादांच्या मार्फत मार्गी लागल्यामुळे मी ग्रामपंचायतचे पद घेऊन काम करावे अशी दादांची इच्छा होती. दादांची ही इच्छा पूर्ण झाल्याने मला व गावातील सर्व नागरिकांना पूर्ण समाधान वाटत आहे. गेली अडीच वर्षात आ. रोहितदादांची मोठी मदत झाल्याने मी गावात अनेक विकास कामे करू शकलो. याच बरोबर आमदार अरुणकाका जगताप यांचेही मला मोठे सहकार्य लाभल्याने मी यशस्वी राजकीय वाटचाल करू शकलो. हे यश मला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केलेल्या सहकार्यामुळे प्राप्त झालेला आहे. यापुढेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेली सर्व जबाबदारी मी समर्थपणे पार पाडीन. माझे हे यश श्री जगदंबा देवीला व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला समर्पित करतो. गावातील प्रत्येक व्यक्ती ही माझ्या कुटुंबातील आहे, असे समजून मी काम करत आहे, आणि करत राहणार आहे. प्रत्येक कुटुंबाच्या सुखदुःखात मी सहभागी आहे. आपण हाक देताच मी आपल्या मदतीसाठी तत्पर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या निवडीनंतर जगताप यांचे आमदार रोहित पवार यांच्यासह युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन धांडे, दीपक शिंदे, शहराध्यक्ष सुनील शेलार, युवक शहराध्यक्ष विशाल मेहेत्रे आदींसह अनेकांनी अभिनंदन केले आहे.