चिखली (तालुका प्रतिनिधी) – येथील श्री शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालय येथे अकरावी व बारावीच्या विद्यार्थिनींना सुखरुप प्रवासासाठी माेफत एसटी पासचे वितरण करण्यात आले. या सर्व मुली खेड्यापाड्यांतून शिक्षणासाठी चिखली येथे येतात. त्यामुळे त्यांना माेठा आधार झाला आहे. या महाविद्यालयाचे विद्यार्थिप्रिय प्राचार्य देशमुख सर यांनी हा उपक्रम राबविला.
स्थानिक श्री शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालय चिखली येथे दि.18 ऑगस्ट रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ओमराज देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार परिवहन समिती सचिव प्राध्यापक अमोल मोगल यांनी 11 वी व 12 वी तील 60 विद्यार्थिनींची यादी तयार केली. तिला बुलढाणा येथील माध्यमिक शिक्षणाधिकारी मुकुंद यांच्याकडून मान्यता घेऊन पंचायत समितीत जाऊन शिंदे साहेब यांच्याकडून मान्यता घेतली व एसटी आगारातील ढोणे साहेब यांच्याकडून ओळखपत्र व पासेस बनवून घेऊन आज परिवहन समिती अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ओमराज देशमुख, परिवहन समिती सदस्य प्रा.डी.आर.उन्हाळे, प्रा.संजय चिंचोले, लेफ्ट.किरण पडघान, प्रा.राम पवार, प्रा.पूनम वैद्य, प्रा.प्रियंका चव्हाण, प्रा.सागर जाधव या सर्वांच्या उपस्थितीत अहिल्याबाई होळकर पासचे वितरण करण्यात आले. प्राचार्य यांनी सर्व विद्यार्थिनींना सुखरूप प्रवासासाठी शुभेच्छा देऊन सर्व परिवहन समिती तुमच्या सेवेसाठी बांधील आहे. तुम्ही तुमच्या अडचणी स्पष्टपणे मांडाव्यात व दर पंधरा दिवसातून बैठक घेऊन येणाऱ्या समस्या सोडवाव्यात, तसेच प्रत्येक मार्गावर एकदा भेट द्यावी, असे आवाहन समिती सदस्यांना केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.अमोल मुगल यांनी केले, व आभारप्रदर्शन प्रा.राम पवार यांनी केले.