Marathwada

कारमध्ये हे बदल केल्यास पोलिसांनी पावती फाडलीच म्हणून समजा!

पैठण (शिवनाथ दौंड) – नवीन वाहन असो की जुने, ते घेतल्यानंतर मॉडिफाय करण्यासाठी हजारो खर्च केले जातात. असे करणाऱ्या हौशींना आता दंडासाठीही पैशांची तयारी ठेवावी लागणार आहे.  कारण बदल केल्याचे दिसल्यास पोलीस वाहन थांबवून थेट जबर दंडाची पावती हातात सोपविणार आहेत.  पाेलिसांनी या नियमाची काटेकाेरपणे अमलबजावणी सुरु केली आहे.

गाडीचे असे काही पार्ट जे कधीच मॉडिफाय करायचे नसतात, म्हणजे पोलिसही अडवत नाहीत आणि तुमचे नुकसानही होत नाही. वाहनाला रंगीत काच म्हणजेच काचेवर फिल्म लावणे म्हणजे वाहतूक नियमांचे उल्लंघन आहे.  वाहतूक पोलिस हा गुन्हा लगेचच पकडतात आणि लोकांकडून दंड वसूल करतात.  कायद्यानुसार, तुमच्या कारची मागील काचेसाठी किमान ७५% दृश्यमानता आणि बाजूच्या काचांसाठी ५०% दृश्यमानता असणे आवश्यक आहे.  हा केंद्राचा कायदा, राज्याच्या कायद्यांमध्ये यात बदल असतो. काही ठिकाणी फिल्मच लावायच्या नाहीत, असेही आहे.

अनेक तरुणांना आपल्या कारचा वेगळा शो-ऑफ करण्याची आवड असते.  ते वाहनांना बाजारात उपलब्ध असलेले फॅन्सी सायलेन्सर बसवितात.  त्यांना असे वाटते की त्यांच्या वाहनातून निघणारा आवाज त्यांचे वाहन इतरांपेक्षा वेगळे ठरवतो.  परंतू, असा आवाज ऐकला की वाहतूक पोलीस कान टवकारतात, थांबवतात आणि दणकून चलन कापतात.  आता या सायलेन्सरबरोबर अन्य मॉडिफिकेशन देखील पकडले जातात. अनेकवेळा तुम्ही ट्रक किंवा कारमधील वेगळा, कुत्रा भुंकताना किंवा अन्य आवाज काढतानाचे हॉर्न ऐकले असतील. एखाद्या वाहनात असा फॅन्सी सायरन आणि प्रेशर हॉर्न लावल्याचे निदर्शनास आल्यास पोलिस तात्काळ ते थांबवून चलन कापतात. कारण हे देखील बेकायदेशीर दुरुस्तीच्या यादीत येते. यामुळे कर्णकर्कश आवाज आणि अचानक भीतीचे वातावरण देखील तयार होते. यामुळे अपघात होण्याची शक्यता असते.


तुम्ही तुमच्या वाहनाचे फक्त काही भाग बदलू शकता? सर्वच सुटे भाग बदलू शकत नाही.  लोकांना हौस असते की त्यांची कार गर्दीतही उठून दिसावी असे वाटते कोण जाणे,  पण ते लोकांच्या नजरेत भरेल असे पार्ट बदलतात. त्यावर हजारो रुपये खर्चही करतात. आफ्टर-मार्केट अलॉय व्हील किंवा लेदर सीट कव्हर्स यांसारखे छोटे बदल चालून जातात,  त्यावर काही नियम नाहीत. परंतू, वाहनाचे काही पार्ट आहेत जे बदलणे बेकायदेशीर आहे, यामुळे वाहतूक पोलीस जबर दंड ठोठावू शकतात.

– काकासाहेब नागवे, पोलीस उपनिरीक्षक, धुळे सोलापूर महामार्ग पोलीस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!