धुळे (ब्युरो चीफ) – वंदे मातरम्, इंकलाब जिंदाबाद अशा घोषणांनी धुळे शहरातील अग्रसेन महाराज चौकात जमलेल्या धुळेकर नागरिकांच्या उपस्थितीत १ हजार १११ फुटाचा तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. प्रशासकीय अधिकारी, शाळकरी मुलं, अंगणवाडी सेविका यांसह विविध सामाजिक राजकीय संघटनांसह सर्वसामान्य नागरिकांनी तिरंगा रॅलीत सहभागी होत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.
भारत देशाच्या अमृतमहोत्सवानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासाठी बलिदान देणार्या क्रांतिकारकांना आदरांजली म्हणून व त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजादी का अमृतमहोत्सव साजरा करण्याचे देशाला आवाहन केले होते. आज क्रांतीदिनाचे औचित्य साधत देशभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. धुळे शहरातदेखील निघालेल्या तिरंगा रॅलीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. अग्रसेन चौकातून निघालेल्या रॅलीचा समारोप महात्मा गांधी पुतळाजवळ असलेल्या ७५ फूट स्तंभावर ध्वजवंदन करत करण्यात आला.