आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात परंपरांचे पालन करीत, या वर्षी श्रावणातील नागपंचमी सण उत्साहात साजरा करण्यात आला. नेहमी गर्दीने फुललेले माऊली मंदिर यावर्षीही श्रींचे दर्शनास भाविकांनी गर्दी केली.
आळंदीतील मानकरी कुटुंबातील महिला यांनी परंपरागत पद्धतीने उत्साहात नागदेवतेची पूजा करून नागपंचमी सण साजरा केला. या प्रसंगी नागदेवताची आळंदी नगरपरिषद चौकात पूजा करण्यात आली. त्यानंतर सनई वाद्यवादनात श्री राम मंदिर, श्री विष्णू मंदिर या ठिकाणी जात श्रींचे आगमन माऊली मंदिरात झाले. येथे परंपरेने पूजा करण्यात आली. यावेळी रेखा कुऱ्हाडे, पुष्पा चिताळकर पाटील, माजी नगरसेविका ज्योती चिताळकर पाटील , सृष्टी घुंडरे या मानकरी कुटुंबातील महिलांनी नागदेवताची विधिवत पूजा केली. आळंदीतील माऊली मंदीर परिसरात विविध प्रकारचे खेळ खेळण्यास महिला भाविकांची मोठी गर्दी होती. मंदिरातील परंपरेचे कार्यक्रम परंपरांचे पालन करीत झाल्याचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले.
Leave a Reply