राज्यात युती सरकार येताच खामगांव शहरातील विकास कामांचा रथ पुन्हा जोरात
खामगाव (ब्रेकिंग महाराष्ट्र) :- शहरातील विविध विकास कामे मागील काँग्रेस महाआघाडी सरकारच्या कार्यकाळात प्रलंबीत होती. संपुर्ण शहराच्या विकासासाठी मंजूर निधी एकाच वार्डात वळविण्याचा प्रताप आघाडी सरकारने केला होता. परंतु राज्यात भाजपा युती सरकार येताच खामगांव शहराच्या व मतदारसंघातील विविध कामांना मंजूरात मिळाली असून शहरातील सर्व प्रभागातील 5 कोटी रुपयांच्या कामांना मंजूरी देण्यात आली आहे.
खामगांव शहरातील नागरी सेवा सुविधा पुरविणे या योजनेंतर्गत खामगांव न.प.हददीतील खटी लेआऊट अग्रवाल ते भोजनेसाहेब ते ठाकुर ते रिलायन्स पेट्रोलपंप पर्यंत नाली बांधकाम करणे ,खामगांव न.प.हददीतील अभंग कॉलनी रा.म.क्र.6 ते डॉ उन्हाळे ते जोशी सर ते तायडे यांच्या मळयापर्यंत रस्ता मजबूतीकरण व डांबरीकरण करणे ,खामगांव न.प.हददीतील डी पी रोड आस्था अपार्टमेंट ते मुकेश सानंदा यांच्या घरापर्यंत रस्ता मजबूतीकरण व डांबरीकरण करणे तसेच नाली बांधकाम करणे,खामगांव न.प.हददीतील हनुमान मंदीरापासून ते लखन शाहू यांचे घरापर्यंत रस्ता व डांबरीकरण करणे तसेच नाली बांधकाम करणे,खामगांव न.प.हददीतील श्री राजेश ठाकरे ते देविसींग चव्हाण ते नाल्यापर्यंत धाप्यासह नाली बांधकाम करणे,खामगांव न.प.हददीतील जिया कॉलनी ते सत्तार भाई देवानी यांच्या घरापर्यंत पेव्हर ब्लॉक बसविणे,खामगांव न.प.हददीतील बोबडे कॉलनी अग्रवाल ते दादासाहेब बोबडे ते शर्मा ते टाले यांच्या घरापर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे,खामगांव न.प.हददीतील मादन प्लॉट येथे आगाशे काका यांच्या घरासमोरील खुल्या जागेवर पेव्हर ब्लॉक बसविणे,खामगांव न.प.हददीतील श्री पंजाबराव चिंचोळकर ते श्री बोरले नाली बांधकाम करणे, खामगांव न.प.हददीतील श्री अघाव ते श्री राठी रस्ता सिलकोट कारपेट डांबरीकरण करणे,खामगांव न.प.हददीतील नवीन बी एच एम एस कॉजेजच्या दक्षीण बाजूला पासून ते जोहार्ले लेआऊट पर्यंत नाली बांधकाम करणे ,खामगांव न.प.हददीतील संतविहार ओकांर नगरी यंथे महादेव मंदीराजवळ सभामंडप बांधकाम करणे,खामगांव न.प.हददीतील करनानी ते मकवाना चाट ते कॅपिटल टेलर पर्यंत पेव्हर ब्लॉक बसविणे,खामगांव न.प. हददीतील ॲड अग्रवाल ते डॉ मंत्री ते जनता बँक पर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण व नाली बांधकाम करणे,खामगांव न.प. हददीतील सनी पॅलेसच्या मागे देवगीरीकर टेलर ते राठोड यांच्या घरापर्यंत पेव्हर ब्लॉक बसविणे,खामगांव न.प. हददीतील कुटे यांच्या घरापासून ते अहिर यांच्या घरापर्यंत पेव्हर ब्लॉक बसविणे,खामगांव न.प. हददीतील घोडके यांच्या घरापासून ते गोपाल भाईजी शर्मा यांच्या घरापर्यंत पेव्हर ब्लॉक बसविणे,खामगांव न.प. हददीतील गोपाल भाईजी यांचे घरापासून ते कुटे यांच्या घरापर्यंत पेव्हर ब्लॉक बसविणे,खामगांव न.प. हददीतील प्रभाग 8 मध्ये रस्ता काँक्रीटीकरण करणे,खामगांव न.प. हददीतील श्री एकडे यांच्या घरापासून ते श्री परकाळे यांच्या घरापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे ,खामगांव न.प. हददीतील श्री मोरखडे यांच्याघरापासून ते डी पी रोड पर्यंत रस्ता डांबरीकरण करणे,खामगांव न.प.हददीतील दिलीप शेटये यांच्या घरापासून ते पिंटू मिरगे यांच्या घरापर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण करणे,खामगांव न.प.हददीतील भाटिया नगर येथे मिरगे यांच्या घरापासून रामा लाहुडकर यांच्या घरापर्यंत पेव्हर ब्लॉक बसविणे,खामगांव न.प.हददीतील चिराग भगरिया ते अग्रवाल व अग्रवाल ते आनंद सेवक यांच्या घरापर्यंत पेव्हर ब्लॉक बसविणे,खामगांव न.प.हददीतील रशीद बुलाणी ते मौसीक मदरश्या पर्यंत पेव्हर ब्लॉक बसविणे,खामगांव न.प.हददीतील फाटकपूरा भागातील अब्दुल हमीद चौक ते मदीना किराणा पर्यंत पेव्हर ब्लॉक बसविणे,खामगांव न.प.हददीतील फाटकपूरा भागात पेव्हर ब्लॉक बसविणे,खामगांव न.प.हददीतील टिळक मैदान ते मस्तान चौक जोडणारा पुलाचे बांधकाम करणे,खामगांव न.प.हददीतील संतोष चौधरी यांचे घरापासून ते गजू पाटील ते आश्रम पर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण करणे ,खामगांव न.प.हददीतील रेखा प्लॉट पंकज पाटील यांच्या घरापासून ते सचिन काटकर यांच्या घरापर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण करणे ,खामगांव न.प.हददीतील कासलीवाल लेआऊट मनोहर शेळके यांच्या घरापासूत ते विशाल गिरी यांच्या घरापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे,खामगांव न.प.हददीतील सुदर्शन गेट ते शेरावाली मंदीर रस्ता काँक्रीटीकरण करणे ,खामगांव न.प.हददीतील शर्मा यांचे घरापासून ते मसने गुरुजी यांचे घरापर्यंत पेव्हर ब्लॉक बसविणे भाटीया ले आऊट, खामगांव न.प.हददीतील कासलीवाल लेआऊट येथे मोहन सावरकर यांच्या घराजवळील हापशी पासून ते शंकर वाधवाणी यांच्या घरापर्यंत रसता डांबरीकरण करणे,खामगांव न.प. हददीतील धमेंद्र ठाकुर ते गोपाल ठाकूर यांच्या घरापर्यंत काँक्रीट नाली बांधकाम करणे,खामगांव न.प. हददीतील श्री वानखडे ते पप्पु देशमुख यांच्या घरापर्यंत रस्ता पेव्हर ब्लॉक बसविणे,खामगांव न.प.हददीतील गोपाळ नगर मोहनराव देशमुख यांच्या घरापासून ते म्हैसने गुरुजी यांच्या घरापर्यंत पेव्हर ब्लॉक बसविणे खामगांव न.प.हददीतील न.प.शाळा क्र.12 जवळ बांधण्यात आलेल्या अभ्यासिका अद्यावत करणे, खामगांव न.प.हददीतील न.प.शाळा क्र.12 जवळ बांधण्यात आलेल्या अभ्यासिका अध्यावत करणे, खामगांव न.प.हददीतील डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे नव्याने बांधण्यात आलेल्या महिला व पुरुष जिम अध्यावत करणे, खामगांव न.प. हददीतील श्री संजय शिनगारे ते श्री जोशी यांच्या घरापर्यंत रस्ता बांधकाम करणे या एकुण 5 कोटी रुपयांच्या कामांचा समावेश आहे.
काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात खामगांव शहर व मतदार संघातील कामांचा रथ मंदावला होता. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात तर शहराच्या सर्वांगीण सर्वसमावेशक विकास कामांसाठी मंजूर असलेली 5 कोटी रुपयांची कामे एकाच वार्डात वळविण्याचा प्रताप देखील करण्यात आला. एकीकडे भाजपा सरकार हे सबका साथ सब का विकास या घोषणेप्रमाणे कार्य करीत असतांना काँग्रेस महाविकास आघाडी सरकार मात्र फक्त़ एका वार्डात निधी देऊन कोणाचा विकास करीत आहे हा प्रश्न निर्माण होता. तसेच यांना शहरातील इतर प्रभागातील जनतेच्या विकास कामे करण्याची त्यांच्या समस्या सोडविण्याची गरज नाही आहे काय हा देखील सर्वसामान्य़ जनतेला पडला आहे.
बहुचर्चित मस्तान चौक भागातील पुलासाठी 1 कोटी मंजूर- आ.ॲड.आकाश फुंडकर
खामगांव शहरातील बहुचर्चीत मस्तान चौक व टिळक मैदानाला जोडणारा अत्यंत महत्वाच्या पुलाचा देखील या कामात समावेश असून या पुलासाठी रु 1 कोटी मंजूर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या पुलाचे यापुर्वीच्या आघाडी सरकारच्या कार्यकाळात काय झाले हे या परिसरातील नागरीकांना चांगले माहित आहे. यामुळे या परिसरातील नागरीक आमदार ॲड आकाश फुंडकरांचे आभार मानत असून येत्या काळात लवकरच या पुलाचे काम सुरु होऊन भव्य़ असा पुल या परिसरातील नागरीकांना दळणवळणासाठी बांधण्यात येणार आहे. हा पुल एक ऐतिहासिक काम म्हणून खामगांवाच्या इतिहासात लिहीला जाणार आहे.