Breaking newsBULDHANAChikhaliVidharbha

शेतकरी नेते विनायक सरनाईक, नितीन राजपूत यांच्या अन्नत्याग आंदोलनाची यशस्वी सांगता!

– बांधकाम कामगारांना प्रमाणपत्र देण्याचे ग्रामसेवकांना आदेश
– भक्ती महामार्ग रद्द करण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक; शेतकर्‍यांशी चर्चा करून निर्णय घेणार!

चिखली (एकनाथ माळेकर) – महाराष्ट्र क्रांतीकारी आघाडीचे समन्वयक तथा शेतकरी नेते विनायक सरनाईक यांच्यासह नितीन राजपूत यांनी गेल्या पाच दिवसांपासून शेतकरीहिताच्या मागण्यांसाठी चिखली तहसील कार्यालयासमोर सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन आज (दि.९) अखेर यशस्वीरित्या मागे घेण्यात आले. या दोन्ही नेत्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या असून, त्यामुळे शेतकरीवर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. १५ ऑगस्टपर्यंत पीकविमा नुकसान भरपाई पात्र शेतकर्‍यांच्या खात्यात जमा केली जाईल, असे लेखीपत्र पीकविमा कंपनीने आंदोलकांना दिले असून, तसे झाले नाही तर या कंपनीवर कायदेशीर कारवाई करू, असे लेखीपत्र जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी दिले आहे. या शिवाय, बांधकाम कामगारांना नोंदणी प्रमाणपत्र, विहिर लाभार्थ्यांना विहिरींचे वाटप याबाबतही लेखी स्वरूपात पत्र देण्यात आल्याने, व सर्वच मागण्या मान्य झाल्याने सरनाईक व राजपूत यांनी आज नागपंचमीच्या सणावर आपले अन्नत्याग आंदोलन मागे घेतले. कृषी उपसंचालक श्रीमती कणखर, तहसीलदार संतोष काकडे, गटविकास अधिकारी सुरडकर, कृषी अधिकारी ज्ञानेश्वर सवडतक यांच्या उपस्थितीत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्याहस्ते शरबत पिऊन हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. या दोन्हीही नेत्यांची प्रकृती प्रचंड खालावल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. दरम्यान, हे आंदोलन यशस्वीरित्या स्थगित करण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आज दिवसभर प्रचंड धावाधाव व आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे अधिकारी, व राज्यस्तरीय नेतृत्वदेखील सुतासारखे सरळ झाल्याचे दिसून आले.
लेखी आश्वासनानंतर अन्नत्याग आंदोलनाची सांगता.

गेल्या वर्षीचा प्रलंबित पीकविमा, नुकसान भरपाई तसेच भक्ती महामार्ग रद्द करा, तालुक्यातील रखडलेले विहिरींच्या प्रस्तावांना मान्यता मिळावी, यासह शेतकरी व कामगारांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी नेते विनायक सरनाईक व नितीन राजपूत यांनी चिखली तहसील कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलनास दि. ५ ऑगस्टपासून सुरुवात केली होती. जोपर्यंत राज्य सरकार शेतकरीहिताच्या मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत मैदान सोडणार नसल्याची आक्रमक भूमिका घेतल्याने राज्य सरकार हादरले होते. या आंदोलनास सर्व शेतकरी संघटनांसह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनीदेखील पाठिंबा दर्शविला होता. सरनाईक व राजपूत यांच्या मागण्यांसंदर्भात चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी राज्य सरकार पातळीवर जोरदार पाठपुरावा केल्याने सरकारने उच्चस्तरीय बैठक घेत, यातील बहुतांश मागण्या कालच मंजूर केल्या होत्या. तर आज स्थानिक प्रशासकीय पातळीवरील सर्वच मागण्या मान्य करण्यात आल्यात. त्यातील प्रमुख मागणी असलेली पीकविमा रक्कम मिळणेबाबतची तर भारतीय कृषी विमा कंपनीने लेखीपत्र देत, येत्या सहा दिवसांत म्हणजे १५ ऑगस्टपर्यंत पीकविमा रक्कम पात्र शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा केली जाईल, असे लेखी दिले आहे. तसेच, ज्या शेतकर्‍यांच्या तांत्रिक अडचणी आहेत, त्यांची खातेदुरूस्ती करण्याची तयारीही कंपनीने दाखवली आहे. कंपनीने ही कारवाई न केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाईच आश्वासन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी आंदोलकांना दिले आहे. पंचायत समितीचे बीडीओ यांनीदेखील बांधकाम कामगारांना नोंदणी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात सर्व ग्रामसचिवांना आदेश दिले असल्याचे लेखीपत्र दिले.
यासह राज्य सरकारच्या पातळीवरील इतरही मागण्या कालच मान्य झाल्या होत्या. तसेच, महावितरणनेदेखील या आंदोलकांना त्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसंदर्भात कालच लेखीपत्र दिले होते. त्यामुळे सर्वच मागण्या मान्य झाल्याने शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्याहस्ते व कृषी उपसंचालक श्रीमती कणखर, तहसीलदार संतोष काकडे, गटविकास अधिकारी सुरडकर, तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर सवडतकर यांच्यासह इतर प्रमुख अधिकारी, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सायंकाळच्या सुमारास शेतकरी नेते विनायक सरनाईक व नितीन राजपूत यांनी आपले अन्नत्याग आंदोलन मागे घेतले.

पाच दिवसांच्या अन्नत्याग आंदोलनामुळे विनायक सरनाईक यांची प्रकृती कमालीची खालावली असून, त्यांच्यावर सरकारी दवाखान्यात वैद्यकीय उपचार सुरू आहेत. सद्या त्यांची तब्तेत स्थीर आहे.

सलग पाच दिवस पोटात अन्नाचा कणही न गेल्याने या दोघांना तातडीने रूग्णालयात हलविण्यात आले. सद्या त्यांची प्रकृती स्थीर असून, त्यांच्या आंदोलनाची यशस्वी सांगता झाल्याने अनेक गावांत शेतकर्‍यांनी आनंद व्यक्त केला होता. यावेळी एकनाथ थुट्टे,सुधाकर तायडे,गजानन कुटे,अरुण पन्हाळकर,अरुण नेमाने, सतिष सुरडकर, औचितराव वाघमारे, रमेश कुटे,रवि टाले,कुंदन यंगड,कृष्णा सपकाळ,राम आंभोरे, संतोष शेळके, कौतिकराव ठेंग,गणेश देशमुख,मोहन परीहार,विठ्ठल सरनाईक, विठ्ठल सोळंकी,पवन ठेंग,मदन आंभोरे,अमोल सरनाईक,पवन चव्हाण,आमोल मोरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.


रविकांत तुपकर धावून आले आणि आंदोलनाची यशस्वी सांगता झाली!

काल, दि. 8 ऑगस्ट रोजी उपोषण मंडपात अधिकार्‍यांसोबत झालेल्या चर्चेत शेतकरी नेते तथा महाराष्ट्र क्रांती रविकांत तुपकरांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर १५ ऑगस्टआधी चिखली तालुक्यातील पात्र शेतकर्‍यांच्या खात्यावर रक्कम जमा करणार असल्याचे विमा कंपनीने मान्य केले आहे, जर १५ ऑगस्टपर्यंत कंपनीने पैसे जमा केले नाही तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन कृषी विभागाने दिले आहे. त्याचबरोबर विमा कंपनीचे मुजोर जिल्हा प्रतिनिधी यांचीदेखील तातडीने बदली करण्यात आली आहे.

विनायक सरनाईक व नितीन राजपूत यांनी दि.०५ ऑगस्टपासून चिखली तहसील कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली होती. त्यांच्या आंदोलनाला शेतकर्‍यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. आज पाचव्या दिवशी आंदोलनकर्त्यांची प्रकृती खराब झाल्याने आंदोलनस्थळी तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, दुपारी शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी आंदोलन स्थळी भेट देत अधिकार्‍यांशी चर्चा केली, यावेळी तहसीलदार संतोष काकडे, कृषी उपसंचालक संजीवनी कणखर, तालुका कृषी ज्ञानेश्वर सवडकर, अधिकारी चिखली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री.सुरडकर व ठाणेदार संग्राम पाटील उपस्थित होते. या चर्चेदरम्यान रविकांत तुपकर व शेतकर्‍यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर १५ ऑगस्टआधी चिखली तालुक्यातील पात्र शेतकर्‍यांच्या खात्यावर रक्कम जमा करणार असल्याचे विमा कंपनीने मान्य केले आहे, जर १५ ऑगस्टपर्यंत कंपनीने पैसे जमा केले नाही तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन कृषी विभागाने दिले आहे. त्याचबरोबर विमा कंपनीचे मुजोर जिल्हा प्रतिनिधी यांचीदेखील तातडीने बदली करण्यात आली आहे. तर घरकुलाचे व विहिरीचे अनुदान तातडीने देण्याचे लेखी आश्वासन चिखली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी दिले आहे. तसेच चिखली शहरालगतची १६ ते २२ गावे उदयनगर विभागात जोडण्याचा निर्णय महावितरणने मागे घेण्यासंदर्भात प्रस्ताव शासन दरबारी दाखल केला आहे, भक्तीमार्ग रद्द करण्यासंदर्भातचा अहवालदेखील चिखली तहसीलदार यांनी जिल्हाधिकारी यांना पाठविला आहे. तर प्रोत्साहन अनुदानासंदर्भातही उपनिबंधक यांच्या माध्यमातून सोमवारी प्रस्ताव शासन दरबारी पाठविण्यात येणार आहे, यासह आंदोलनातील बहुतांश मागण्या मान्य झाल्याने सरनाईक व नितीन राजपूत यांनी ५ व्या दिवशी अन्नत्याग आंदोलन स्थगित केले आहे. आंदोलनामुळे प्रकृती खराब झाल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सणासुदीचं लेकरू उपाशी बसलं; गावातील महिलांनी घेतली आंदोलनस्थळी धाव! – breakingmaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!