BuldanaBULDHANA

संत गजाननांच्या भक्तांसाठी लासुरा येथे विशेष वैद्यकीय कक्ष

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – संत गजानन महाराजांच्या पालखीसोबत पायी चालणार्‍या लाखो भक्तगणांच्या आरोग्य सुविधेसाठी केंद्रीय आरोग्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या संकल्पनेतून लासुरा फाटा येथे विशेष वैद्यकीय सेवा आणि मदत कक्ष उभारण्यात आला आहे. यानिमित्ताने ना. जाधव यांनी आपली सेवा संत गजानन महाराजांच्या चरणीच अर्पण केली आहे.

पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनसाठी गेलेली संत गजानन महाराजांची पालखी आषाढी एकादशीचा सोहळा आटोपून पुन्हा शेगावच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे. तब्बल ६१ दिवसाचा पायी प्रवास आटपून ही पालखी १० ऑगस्टला खामगाव नगरीमध्ये पोहोचणार आहे. पालखीचा शेवटचा मुक्कामही खामगाव येथे होणार आहे. त्यानंतर ११ ऑगस्टच्या सकाळीच ही पालखी शेगावच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. या पालखीसोबत खामगाव ते शेगाव असा पायी प्रवास बुलढाणा जिल्ह्यातील लाखो भक्त गण करत असतात. १८ किलोमीटरच्या पायी दिंडी प्रवासामध्ये लहानांपासून तर थोरांपर्यंत श्रीचे भक्तगण या शेवटच्या पालखी प्रवासात सहभागी होतात. आरोग्यसेवा हीच ईश्वरसेवा समजून भक्तगणांच्या आरोग्य सुविधेसाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या संकल्पनेतून विशेष वैद्यकीय सेवा आणि मदत कक्ष लासुरा फाटा येथे उभारण्यात आला आहे. या मदत कक्षेत दोन रुग्णवाहिका, डॉक्टर्स, नर्सेस यांचा पुरेसा स्टाफ आणि औषधी साठा कक्षेत ठेवण्यात आला आहे. पायी चालणार्‍या श्रीच्या भक्तगणांना काही त्रास जाणवल्यास वैद्यकीय मदत कक्षेची मदत घ्या, असे आवाहन रुग्णालय प्रशासन आणि भूमिपुत्र वैद्यकीय मदत कक्षाच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!