साखरखेर्डा (प्रतिनिधी) – बुलडाणा जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत बांधण्यात येणारे नमो ग्रामसचिवालयाने बांधकाम तातडीने थांबवुन सदरचे ग्रामसचिव, गावातील जागेवर करण्यात यावे, अशी मागणी काही ग्रामपंचायत सदस्य यांनी जिल्हाधिकारी यांना एका पत्राद्वारे केली आहे.
साखरखेर्डा गावाकरीता सन २०२३–२०२४ मध्ये नमो ग्रामसचिवालय किंमत ४७ लाख ७९ हजार ५५७ रुपये एवढा निधी मंजूर झालेला आहे व त्याचे काम जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून केले जात आहे. सदरचे नमो ग्रामसचिवालय गावाच्या मध्यभागापासुन दोन कि.मी. अंतरावर बांधले जात आहे. वास्तविक पाहता ग्रामपंचायती जवळ स्वत:चे मालकिची गावठाणामध्ये नझुल शिट नंबर ०१ मधील प्लॉट नंबर ०८ क्षेत्र ५९६५ : ५ चौ.मी एवढी विपुल प्रमाणात जागा उपलब्ध असून, त्यावर बांधकाम होणे आवश्यक आहे. गट नंबर ६६५ क्षेत्र ६, ८१ , ४४ आर हे.आर सरकार या जमिनीपैकी, बांधकामासाठी आवश्यक जागेची ग्रामपंचायत किंवा बांधकाम विभागाने रितसर जिल्हाधिकारी यांना जागा मागणी प्रस्ताव सादर करुन जिल्हाधिकारी यांची मंजुरात घेतल्यानंतरच बांधकाम करणे आवश्यक व नियमोचीत होते व आहे . परंतु महसुल विभागाची कोणतीही परवाणगी न घेता सदरचे बेकायदेशीर बांधकाम जिल्हा परीषद बांधकाम विभाग हे मोजे साखरखेर्डा येथील गट नं. ६६५ सरकार या गायरान जमिनीवर बेकायदेशीरपणे बांधकाम करीत आहे. साखरखेर्डा हे गाव तालुका निर्मीतीसाठी शासनस्तरावर विचारधीन आहे. तसेच सदर गटामध्ये सरकारी क्रीडांगणाचे बांधकामासाठी जागा मागणी प्रस्ताव तहसीलदार सिंदखेडराजाकडे प्रलंबीत आहे. भविष्यात या जागेवर तहसील कार्यालय व गावकऱ्यासांठी अडचन विरहीत क्रींडागण तयार होवू शकतो . नमो ग्रामसचिवालयाचे बेकायदेशीर बांधकाम झाल्यास सरकारी जमिनीचे अपव्यय होईल, सदरचे बांधकाम करण्यासाठी बांधकाम विभागाकडून खड्डे खोदण्यात आलेले आहे . तरी तात्काळ सदरचे बांधकाम थांबवून, ग्रामसिचावालयाचे बांधकाम ग्रामपंचायत मालकीची जागा गावठाणातील नझुल शिट नंबर ०१ मधील प्लॉट नंबर ०८ क्षेत्र ५६६५ : ५ चौ.मी या जागेवर करण्याचे आदेश देण्यात यावे. व गट नं. ६६५ मधील सरकारी जमीन गावकऱ्यांसाठी व सरकारी कामासाठी वाचविण्यात यावी, अशी मागणी भाजपाचे प्रदेश सदस्य तथा ग्रामपंचायत सदस्य उल्हास देशपांडे , ग्रामपंचायत सदस्य सौ . सुनिता दिलीप बेंडमाळी , गोपाल शिराळे , दत्ता लष्कर , गणेश शिराळे यांनी जिल्हाधिकारी , मुख्य कार्यपालन अधिकारी , जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्याकडे केली आहे .
——-
साखरखेर्डा येथील गट नंबर 665 मध्ये गायरान सरकारी जमिनीवर नमो ग्राम सचिवालयचे बांधकाम मर्जीतील ठेकेदाराव्दारे अत्यंत गुपचूप पद्धतीने सुरू करण्यात आले आहे. या कामात मोठं काळेबेरे होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. साखरखेर्डा येथे या पूर्वीच तीन ग्राम सचिवालय अस्तित्वात असून, ते सुसज्ज अवस्थेत आहे. लाखो रुपये खर्च करून येथे नव्यानेच बांधण्यात आलेल्या ग्राम सचिवालयची तीन मजली इमारत असून येथे सुसज्ज ग्राम पंचायत कार्यालय मिटिंग हॉल, सरपंच, उपसरपंच, ग्राम विकास अधिकारी यांना कामकाज पाहण्यासाठी स्वतंत्र केबिन रूम आहेत. हे कार्यालय गावाच्या मध्यभागी आजही सुरू आहे. नवीन ग्रामपंचायत भवन हा गावाच्या दोन किलोमीटर बाहेर होणार आहे. त्यामुळे येथील नागरिकांना तेथे जाण्यासाठी फार त्रास सहन करावा लागणार आहे. सुसज्ज ग्रामपंचायत कार्यालय असतांनासुद्धा दुसरं बांधकाम म्हणजे जनतेच्या घामाच्या पैश्याची उधळपट्टी असल्याचे दिसत आहे.