ChikhaliUncategorized

मेंढळपाळ हाणामारीप्रकरणी चारही आरोपी जेरबंद, न्यायालयातून जामीन

मेरा बु. ता. चिखली ( प्रतिनिधी) – मेंढ्या चारण्याच्या कारणावरून मेंढपाळ चार लोकांनी एकाला बेदम मारहाण करून हाताचे बोट फॅक्चर केले होते, अशा फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी दि ९ मे रोजी चार आरोपी विरुद्ध ३२५ , ३२३, ५०४ , ५०६ , ३४ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात आज दि. २१ जुलै रोजी पोलिसांनी चारही आरोपीना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना जामीन देण्यात आला आहे.
अंढेरा पोलिसा कडून मिळालेल्या माहितीनुसार मेंढपाळ कान्हा सत्तुबा शिंगाडे वय ३५ वर्ष रा सहस्रमुळी ता. मोताळा हे रोहडा शेत शिवारात मेंढया चारण्यासाठी घेवून आले होते. रोहडा शिवारातील मोतीराम तळेकर यांच्या शेत रस्त्यावरून मेंढ्या चारत चारत जात असतांना रोहडा गावातील नंदु ऊर्फ नंदकिशोर भुसारी , एकनाथ भुसारी, सुनिल भुसारी , भगवान भुसारी हे फि जवळ आले आणि म्हटले की तु रोहडा शिवारात शेळया मेंढया चारण्यासाठी कसा काय आला, असे म्हणुन त्यांने शिवीगाळ करण्यात सुरवात केली. त्यानंतर एकनाथ भुसारी, सुनिल भुसारी, भगवान भुसारी यांनी फिर्यादीला लाथाबुक्यानी आणि एकनाथ भुसारी व सुनिल भुसारी यांनी काठीने मारहाण केली. त्यामुळे फिर्यादीचे उजवे हाताचे बोटाला मार लागल्याने उपचारासाठी चिखली येथील जवंजाळ हॉस्पीटलमध्ये भरती केले. डॉक्टराच्या एक्सरे रिपोर्ट वरुन उजवे हाताचे बोटे फॅक्चर असल्याचे निष्पन्न झाल्याने ९ मे रोजी पोलिसांनी आरोपी विरुध्द ३२५ , ३२३, ५०४ , ५०६ ,गुन्हा दाखल केला होता. तसेच सदर गुन्हयात फिर्यादीने सांगीतल्याप्रमाणे बिट अमलदार सिरसाट व पोफळे यांनी घटनास्थळ पंचनामा करण्यात आला. सदर पंचनाम्यामध्ये जबाबामध्ये फिर्यादीने नजर चुकीने रिपोर्ट मध्ये भगवान भुसारी हे नाव टाकले असून सदर इसमाचे नाव हे भगवान प्रभाकर सोरमारे हे असल्याचे सांगितल्या सदर गुन्हयात ठाणेदार गणेश हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली कलम ३४ भादवी वाढ करण्यात आली असून, सदर गुन्हयात आरोपी कडून काठ्या जप्ती जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपीच्या वैद्यकीय तपासणी करुण आरोपीं नामे नंदू उर्फ नंदकिशोर गणपत भुसारी वय ३१ वर्ष , सुनिल एकनाथ भुसारी वय ३३ , एकनाथ संपत भुसारी वय ६० , भगवान प्रभाकर सोरमारे वय २२ सर्व राहणार सहस्रमुळी ता. मोताळा ह मु रोहडा शेत शिवार यांना २१ जुलै रोजी रोहडा येथून अटक करण्यात आली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना जामीन मंजूर केला आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!