BULDHANA

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण मित्र, सेव्ह वसुंधरा व वन विभागाच्यावतीने वृक्षारोपण

बुलढाणा (प्रतिनिधी) – जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण मित्र मंडळ बुलडाणा, सेव्ह वसुंधरा ग्रुप, व वन विभागाच्यावतीने वृक्षारोपण करुन जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त बुलडाणा शहरातील मलकापूर रस्त्यांवरील नळगंगा व्ह्यू पॉईंट, जैस्वाल ले आऊटमधील रामकृष्ण मिशनच्या बाजूला असलेल्या मोकळ्या भूखंड आणि वन विभागाच्या राणी बगीचा येथे मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले.

दरवर्षी पर्यावरण मित्र बुलडाणाच्यावतीने 2016 पासून सायकल रॅली काढून पर्यावरण जागृतीचा संदेश दिला जातो . सदर सायकाल रॅलीस हजारो नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळतो . परंतू या वर्षी निवडणूक आचारसंहिता असल्याने सायकल रॅली न काढता सायकल रॅलीच्या परंपरेत खंडीत होऊ नये यासाठी नळ गंगा व्ह्यू पॉईंटपासुन ते राणी बगीचापर्यंत मोजक्या पर्यावरण मित्रांच्या वतीने सायकल रॅली काढून सायकल रॅलीस खंड पडू दिला नाही. यावेळी झाडे लावा झाडे जगवा, माकड करते हुप हुप, झाडे लावा खूप खूप, एकच लक्ष फक्त वृक्ष अशा घोषणा देत सायकल रॅली काढण्यात आली. पर्यावरण मित्र बुलडाणाच्यावतीने नळ गंगा व्ह्यू पॉईंट येथे वृक्षारोपण करून जागतीक पर्यावरण दिन साजरा केला, तसेच तेथूनच प्रातिनिधिक स्वरूपात सायकल रॅली काढण्यात आली. जैस्वाल ले आऊट मधील रामकृष्ण मिशनच्या बाजुला असलेल्या मोकळ्या भुखंडावर सेव्ह वसुंधरा ग्रुपच्या माध्यमातून वृक्षारोपण करून स्वच्छ्ता व जन जागृती अभियान राबविण्यात येवून या सायकल रॅलीचा राणीच्या बगीच्यात वृक्षारोपण करून समारोप करण्यात आला.
वृक्षारोपण कार्यक्रमात उपवंसवृक्षक श्रीमती सरोज गवस, जिल्हाधिकारी यांच्या सुविध्य पत्नी सौ शिला किरण पाटील,पर्यावरण मित्र चंद्रकांत काटकर , अनु माकोने, जयंत दलाल, प्रदीप डांगे, मुकुंद वैष्णव , गोपालसिंग राजपूत, दीपक पाटील, संगीता मदान, प्रीती डांगे, डॉ गायत्री सावजी, सार्थक डांगे, सोहम कुंभार, ओम कुंभार, संगीता मदान, जीवन जाधव,कल्पना माने, महादेव बोराडे, नीलेश शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी अभिजीत ठाकरे, सामाजिक वनीकरणचे गीते सर, डॉ सदावर्ते, डॉ संजय गवली, गोपालसिंग राजपूत,डॉ किनगे, खान साहेब, अमोल कुंभार, सोहम कुंभार,प्रिया सोनुने, ओम कुंभार, सेव्ह वसुंधरा ग्रुपच्या सदस्या भाविका धनवाणी , शुभांगी गव्हाळे , मोक्षदा धनवणी , शितल सोनुने , हेमा धनवानी , मनीषा कोठारी ,सुरेखा जतकर , मनोरमा जैस्वाल , विद्या घोंगटे, सीमा सरदार , सुलभा पाटील , पद्मा परदेशी ,नीता देशपांडे , वर्षा बोबडे , सोनाली कथने व इतर पर्यावरण मित्र आणि सेव्ह वसुंधरा ग्रुपच्या सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!